भोकर (बातमीदार) दि.२८ - गिता जयंती निमित्ताने विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने दसरा मारोती मंदिरापासून संपूर्ण भोकर शहर भगवे ध्वज हातात घेऊन शौर्य पथसंचलन करुन दिंडीच्या आयोजनातुन संपूर्ण शहर प्रदक्षिणा करण्यात आले.त्यानंतर विश्व कर्मा मंदिर येथे धर्मजागृती सभा घेण्यात आली. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या हिंदू वाहिणीच्या वतीने गिता जयंती मोठ्या उत्साहात असंख्य हिंदू धर्मी यांच्या सहभागाने करण्यात आले.भोकर येथील मारोती मंदिरापासून सुरुवात करत लहुजी चौक,शिवाजी महाराज चौक ते मोंठा परिसर मार्ग, आंबेडकर चौक ते गांधी चौकातुन मार्गस्थ करत दसरा मारोती मंदिराजवळ या शौर्य पथसंचलनाचा समारोप करण्यात आला.
यानंतर धर्म जागरण सभा आयोजित करण्यात आली.या धर्म जागरण सभेत मार्गदर्शन करताना महंत केशव बुवा कपाटे म्हणाले कि,मोह माणसाच्या आयुष्यात विनाकारण कारणीभूत ठरतात म्हणून माणसाने मोहा पासुन दुर व्हावे किंवा रहिले पाहिजे असे विचार धर्म जागरण सभेत मांडले. यावेळी मुख्य वक्ते शिवराज कोरे यांनीही विचार मांडले.या सभेत दत्तगड संस्थानचे उत्तम बन महाराज, विश्वकर्मा मंदिराचे परमेश्वर महाराज यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रस्तावना अमोल पोलादवार यांनी केले तर सुत्रसंचलन किरण बिच्छेवार व आभार जिल्हा मंत्री साईनाथ रेड्डी कोपेलवाड यांनी केले.
खुप सुंदर ...नाईक साहेब...
ReplyDeleteमी प्रा. परशुराम बळीराम पा.माने
आपला मोबाईल क्रं. Send करा.
9420878163