भोकर (सुभाष नाईक किनीकर) दि.२८ - शिवसेना व ठाकरे कुटुंब यांच्यावर अपार निष्ठा ठेवत पक्षप्रमुख मा. तथा राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांचे नुकतेच मनक्याचे ऑपरेशन झाले असल्याने यातुन ते बरे व्हावे व त्यांना दिर्घायुष्य लाभावे आणि उत्तम आरोग्य लाभावे यासाठी बिड जिल्ह्यातील कडवट शिवसैनिक व माजी नगरसेवक सुमंत रुईकर यांनी तिरूपती बालाजीच्या दर्शनाला पायी निघाले.शिवसेना व उध्दव ठाकरे यांचा जयघोष करित ते आणि त्यांचा मित्र श्रीधर जाधव निघाले पण जाधव यांची तब्येत बरी नसल्याने ते माघारी बिडकडे निघाले पण रुईकर मात्र परत न जाता तसेच पायी निघाले. सुमंत रुईकर यांना ताप येत होता तरी ते चालतच राहिली यामुळे त्यांची तब्येत बिघडली व वाटेतच मृत्यू झाला.मृतृ झाल्याची बातमी बिड येथे येताच बिड मधे अनेकांनी तिव्र शोक व्यक्त केला आहे.दि.२६ डिसेंबर रोज रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.बिड जिल्हा शिवसेना स्थापणे पासून कडवट शिवसैनिक म्हणून सुमंत रुईकर यांना ओळखले जायायचे. गत दोन वर्षांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून यासाठी बिड ते तिरुपती बालाजी पायी दिंडी काढली बालाजी नवसाला पावल्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
* शिवसेनेकडून पाच लख मदत व पत्नीला नौकरी *. -------------------------------------------------------
शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी कै.सुमंत रुईकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि शिवसेनेच्या वतीने पाच लाख रुपये व पत्नीला नौकरी आणि मुलांना उच्च शिक्षण तसेच घर बांधून देण्यात येणार आहे.बलीदान व्यर्थ नाही जाणार शिवसेना खंबीर पाठीशी आहे असे चंद्रकांत खैरे म्हणाले.