नंदीग्राम एक्स्प्रेसच्या समोर येऊन तरुणांची आत्महत्या

 

                   प्रतिनिधी / माली पाटील 

∆ जिवन जगनच असाह्य झालेला तरुण आदिलाबाद हुन मुंबईकडे जाणाऱ्या नंदिग्राम एक्स्प्रेस समोर आल्याने त्या युवकांचा मृत्यू झाल्याची घटना हिमायतनगर ते जिरोणा रेल्वे स्थानकाच्या मध्ये घडली आहे.

     नंदिग्राम एक्स्प्रेस हि दि. ६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या हिमायतनगर ते जिरोणा स्थानकाच्या मध्ये आली असताना भिसी येथील तरुण साईराज पांडुरंग भिसे वय २० वर्षं हा धावत्या रेल्वे समोर उडी मारुन जिव दिल्याचे येथे उपस्थित नागरीकानी सांगितले. साईराज पांडुरंग भिसे हा किनवट तालुक्यातील मौजे भिसी या गावचा असुन तो आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता.मुंबईकडे जाणार्या नंदीग्राम एक्स्प्रेसच्या समोर इंजिनच्या बाजुला असलेल्या पिनला अडकल्याने तो युवक फरफटत हिमायतनगर रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे सोबत आला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस घटनास्थळी धाव घेत त्या युवकांचा मृतदेह ताब्यात घेत हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करून त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post