किनी प्रतिनिधी / अनील नाईक
किनी ता.भोकर येथील सार्वजनिक भिम जयंतीची कार्यकारिणी जाहीर झाली असून यात अध्यक्ष म्हणून उपा धम्मपाल कांबळे, उपाध्यक्ष म्हणून उपा शंकर कांबळे तर सचिव म्हणून उपा विठ्ठल रसाळे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.
किनी येथिल बौद्ध वाड्यातील बुद्ध विहारांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या बैठकीत पुढील कार्यकारिणीची निवड सर्वानुमते ठरवण्यात आली. यात समितीचे अध्यक्ष म्हणुन उपा.धम्मपाल परशुराम कांबळे, उपा.शंकर शेटीबा कांबळे, व सचिव म्हणून उपा.विठ्ठल जळबाजी रसाळे यांची निवड करण्यात आली.
सदर बैठकीस उपासक मारुती कांबळे, धर्माजी मुनेश्वर, नामदेव रसाळे, चांदु कांबळे, गणपतराव कांबळे, दिलीप हेमले ,भीमराव रसाळे ,अशोक रसाळे , जय प्रकाश कांबळे सुशांत रसाळे अजय कांबळे अक्षय दातवणे यांचा सह बौद्ध वाड्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते..