प्रतिनिधी / माली पाटील
∆ नाजुक पाकळ्या किती सुंदर असतात रंगीत कळ्या रोजच उमलतात.नजरेत भरणारी सर्वच माणसे असतात.पण तुमच्या सारखी माणसं भाग्यानेच लाभतात.अशा सर्व गुण संपन्न असलेले शिक्षक माधवराव भुतनर यांचा 'सेवापुर्ती सोहळा' मोठ्या उत्साहात खडकी बाजार येथे संपन्न झाला.
शिक्षकानी अनेक पिढ्या घडवल्या आणि चांगले माणसं बनवले.समाजात व शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान अमूल्य आहे.दि.३१ जुलै २०२५ रोजी आपल्या ज्ञानार्जनाने विद्यार्थी घडवत गावातील शाळा सुंदर व स्वच्छ ठेवुन शाळेच्या भरारीसाठी मेहनत घेऊन शाळा नावलौकिक आलेले सर्वगुणसंपन्न व मन मिळावु जि.प.केंद्रीय शाळा खडकी बा.येथील मुख्याध्यापक श्री माधवराव भुतनर निवृत्तीचा दिवस.त्यामुळे दि.१ अॅगष्ट रोजी जि.प.केंद्रीय शाळा खडकी बाजार येथे 'सेवा पुर्ती ' सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.ज्योतीताई तानाजी सोळंके हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून मा.जि.प.सदस्य संभाराव लांडगे, मा. पं.स.सदस्य तथा उपसरपंच बालाजी राठोड, यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख नागोराव शेंडगे, शिवसेनेचे जिल्हा उप- संघटक सुभाष नाईक किनीकर,केशव मेकाले गट शिक्षणाधिकारी,प्रा.श्रीनीवास मस्के आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी शाळा प्रशासन व गावकरी यांच्या वतीने निवृत मु.अ.माधवराव भुतनर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.त्यानंतर शालेय विद्यार्थी,गावकरी,किनी येथील गावकरी, नातेवाईक मंडळी व स्नेही मित्र मंडळी यांच्या कडून सन्मान करण्यात आला.यावेळी प्रिती सुर्यवंशी,अरुण पाटील, धनंजय भारती,पद्माकर कुलकर्णी, प्रकाश पांपटवार, दत्तात्रय धात्रक,देवराल पालेकर, परमेश्वर बाचकलवाड,मंजुषा बोडेवाड,संजय जाते, गायकवाड सर,वड सर, वाघमारे सर, भोटे सर,दिलीप रावते केंद्र प्रमुख,रायेवार श्याम मु.अ.,किनीचे नरसारेड्डी गोपतवाड,तिरुपतरेड्डी मुत्याला,भुमारेड्डी गड्डमवाड, सत्यम रेड्डी कोतुरवाड,यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रस्ताव व सुत्रसंचलन श्रीकृष्ण राचमाळे तर आभार पठाण सर यांनी केले.हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायेवार सर, जाधव सर,नागरगोजे सर,श्रीमती माळुन मॅडम, चामणे मॅडम यांनी केले.