नांदेड येथून १९ वी अमरनाथ यात्रा निघणार



     


     

      जिल्हा प्रतिनिधी / जितेंद्र सरोदे

नांदेड येथन दरवर्षी अमरनाथ यात्रेसाठी भाविक जात असतात पण गत दोन वर्षांपासून करणा-या पहा रोगामुळे यात्रा होऊ शकली नाही दोन वर्षाच्या अंतराने बंद असलेली अमरनाथ यात्रा यंदा ३० जून पासून सुरू होणार असून ती ४३ दिवस चालणार आहे नांदेड येथून १९ वी  अमरनाथ यात्रा १ ते १३ जुलै या कालावधीत पार पडणार असल्याची माहिती भाजप नेते तथा अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष अँड दिलीप ठाकूर यांनी दिली आहे

नांदेड येथून दरवर्षी अमरनाथ यात्रा अखंडपणे सुरू होती मात्र मागील दोन वर्षात ही यात्रा भरली नाही यावर्षी कोरणा कमी झाल्यामुळे भाविकांना या यात्रे विषयी उत्सुकता होती अवघड असणारी अमरनाथ यात्रा सुखरूप पार पडावी यासाठी भाविकांकडून नियमित चालण्याचा सराव व प्राणायाम करून घेतला जातो या वर्षी यात्रेत  अमरनाथ, वैष्णोदेव ,श्रीनगर ,गुलमार्ग, सोनमार्ग,पाणी टाप, खीर भवानी, शक्तिपीठ, जम्मू , अमृतसर, वाघा बॉर्डर या स्थळांचा समावेश आहे इच्छुकांनी नाव नोंदणी करावी असे आव्हान अमरनाथ यात्रा संघातर्फे करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post