कोळगाव खु.येथील चेअरमन व व्हा.चेअरमन यांची बिनविरोध निवड



भोकर -दि.६ - भोकर तालुक्यातील मौजे कोळगाव खु. येथील सेवा सहकारी सोसायटी निवडणूक मधे चेअरमन  व व्हा. चेअरमनची निवडणूक  बिनविरोध करण्यात येऊन यात चेअरमन म्हणून पुनश्च गंगाराम गादेपवाड यांची तर व्हा.चेअरमन म्हणून गणेशराव  राठोड यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी चे स्वागत सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

भोकर  येथील  सहकारी  निंबधक   कार्यालयात झालेल्या निवडणुकीत चेअरमन व व्हा.चेअरमन करण्याचा ठराव संचालक मंडळाने निवडणूक अधिकारी श्री नितीन जाधव यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.या वेळी सर्व संचालकांच्या सहमतीने सर्व चेअरमन म्हणून श्री गंगाराम  गादेपवाड  तर व्हा.चेअमन  श्री गणेश  राठोड  यांची  एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी संचालक श्री साईनाथ बागले, साईनाथ बोईनवाड,शे.साहीब हुसेन शेख.महमद साब,दिगाबंर शिद्धेवाड, पुंडलिक राठोड,चंदु मोटेराव,सौ.सुनीता बाई राजु नरोटे, श्रीमती नरसुबाई म्याकलवाड म्याकलवाड,केला सुंकळेकर,व.अहेमदसाब अब्दुल साब,नागा टोपलवाड हे उपस्थित होते.

सदरील सेवा सहकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून शिवसेनेचे सर्कल संघटक साईनाथ गादेपवाड व सहकार्यानी प्रयत्न केले.व या प्रयत्नास यश येऊन आज दि.७ जुन रोजी सहकार निबंधक कार्यालयात निवडणूक अधिकारी नीतीन जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

विशेष म्हणजे या सोसायटीच्या चेअरमनपदी सेनेचे साईनाथ गादेपवाड यांचे वडील  गंगाराम गादेपवाड हे तब्बल ४५ वर्षं चेअरमन म्हणून कार्यशिल आहेत.त्या मुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर  व भाजपचे सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश पा. कापसे , सेनेचे सुभाष नाईक किनीकर यांनी त्यांचा र्हदयपुर्ण सन्मान शाल श्रीफळ देऊन केला

यावेळी सरपंच दामोदर पाटील अडकिणे, शिवसेनेचे किनी सर्कल प्रमुख रमेश महागाव कर .सरपंच धन्नु राठोड, पांडुरंग गादेपवाड, सचिव आर.एन.मुसांडे आदी उपस्थित होते.सर्वीचे आभार शिवसेना सर्कल संघटक साईनाथ गादेपवाड यां मानले.



Post a Comment

Previous Post Next Post