•
र
प्रतिनिधी / माली पाटील
दि.३ जुन २०२२
राजकारणातील प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढून उपेक्षित वंचित आची स्थापित करण्याचे लोक नेते तथा माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिन सोहळा कार्यक्रम भोकर येथे संपन्न झाला.
शिवसेनेचे सुभाष नाईक किनी कर, सर्कल प्रमुख रमेश महागावकर यांनी आयोजित केलेल्या भोकर तालुका ओबीसी समाजाच्या वतीने दिनांक ३ जून रोजी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवा स्मृतिदिन सोहळा कार्यक्रम भोकर येथील शासकीय विश्राम गृहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन नेते नागनाथरावजी घिसेवाड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री एल.ए.हिरे, ओबीसी नेते तथा पत्रकार श्री बि.आर. पांचाळ ज्येष्ठ नेते भीमरावजी दुधारे यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख शेंडगे बापू हे होते. यावेळी प्रथम स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या तैलचित्राचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर प्रास्ताविक सेनेचे सर्कल प्रमुख रमेश महागावकर यांनी केले. यावेळी खालील उपस्थित मान्यवर संबोधित केले.
जेष्ठ पत्रकार श्री एल.ए.हिरे -सर्वसामान्य व उपेक्षित वंचितांना न्याय मिळवून ओबीसी समाजासाठी लढा देणारे म्हणून सर्जी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पाहिले जात मंडल आयोगाचे ते समर्थक होते अशा महान ओबीसी नेतृत्व गमावल्याने समाजाचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसी नेते तथा पत्रकार बि.आर.पांचाळ - स्व. गोपीनाथ मुंडे म्हणजे जनसामान्यांचे असामान्य नेतृत्व गोपीनाथराव मुंडे साहेब अनेक माणसं घडविली आपल्या हयातीत त्यांनी गोरगरीब उपेक्षितांना न्याय दिला अशा संघर्षशील नेत्याच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो.
उपसरपंच अंबादास अटपलवाड - जनसामान्यांचे खंबीर नेतृत्व कर्तव्याच्या दिल्ली फुलांनी दैवत सजविले ज्यांनी अनंत त्यांची जीवन यात्रा कधी न संपणारी. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना विनम्र विनम्र अभिवादन.
जेष्ठ पत्रकार श्री भिमराव दुधारे - स्व गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री होते ते संघर्ष संघर्षशील नेते होते आपल्या रक्ताचे पाणी करुन भाजपाला मोठे केले पण भाजपने त्यांना मोठा त्रास दिला खडतर परिस्थितीच्या मानगुटीवर पाय ठेवून अनेक ठिकाणी नवे नेतृत्व उभे केले ओबीसीचा प्रश्न लोकसभेत मांडला असा या महान नेतृत्वाला विनम्र अभिवादन.
भाजपाचे श्री प्रशांत पोपशेटवार - सामान्य लोकांच्या प्रश्नाची जाण असणारा आणि खड्या आवाजाने लाखोच्या सभा जिंकणाऱ्या लोकनेते याचा आवाज कायमचा शांत झाला अशा जनसामान्यांचे नेतृत्व करणाऱ्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना कोटी कोटी विनम्र अभिवादन.
यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख नागोराव शेंडगे बापु - दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबाची रिकामी झालेली आकाश पोकळी ! ती कशानेही भरून आली नाही. केंद्र सरकार असो की राज्य सरकार रोख-ठोक आणि अंगावर जाऊन महाराष्ट्रासाठी प्रश्न विचारणारा नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब ! दुर्दैवाने स्वर्गीय प्रमोद महाजन स्वर्गीय विलासराव देशमुख आणि त्यांच्या मागेच गोपीनाथराव च्या जाण्याने राज्याची मोठी हानी झाली सर्वसामान्य व वंचित ओबीसी घटकासाठी आपली जीवन अर्पित केलेल्या या महान स्वर्गीय मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन.
बहुजन नेते श्री नागनाथ घिसेवाड यांनी अध्यक्षीय - समारोप करताना म्हणाले की, आज दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्मरण करताना ग्रामीण भागातून आलेले नेतृत्व सूर्या बांधावर जाऊन चारा छावणी वर मुक्काम ठोकून झोपडीतील भाजी भाकरीची आणि गरिबीची चव घेऊन लोकनेता झाले आज मुंडे साहेब जाऊन आठ वर्षे झाले तरी त्यांची उणीव पावलोपावली जाणवते अशा या महान नेत्याच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा पत्रकार बालाजी येलपे डौरकर यांनी केले.तर आभार शिवसेनेचे तालुका नेते सुभाष नाईक किनीकर यांनी केले.
या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनील कांबळे महिला आघाडीच्या विमलताई गाजुलवार, सुरेखा ताई माळी , शिवसेनेचे आदिवासी नेते गंगाधर मलकलवाड, वेंकट वर्षे वार रमेश बाबा उपसरपंच दिगंबर राठोड लक्ष्मण पवार , हनमनलु नडकुडवाड आदी उपस्थित होते.