भोकर प्रतिनिधी / माली पाटील
• राजकारणाची लय तळाला गेली • कालपर्यंत विरोध अन् आता जयजयकार • पक्ष निष्ठा राहीली नसुन आता फक्त व्यक्ती निष्ठ राजकारण • आताचे राजकारणी म्हणे लोकांचा विश्वास गमावलेले नेते
• जे राज्याच्या राजकारणात चालु आहे, तेच जिल्हा व मतदार संघात सुध्दा राजकारण काटेकोर पणे चालू आहे.आपल अस्तित्व व आपल्या वारसांना पुढील राजकारणात विरोध निर्माण होऊ नये म्हणून यंत्रणेच्या माध्यमातून किंवा सरकारी बाबूचे आश्रय घेऊन वा त्यांच्या संपत्तीवर टाच आणुन पक्षांतर केले जात असुन भोकर तालुक्यात असाच काहीसा प्रकार दिसत आहे.कारण सुधा प्रकल्पाच्या जलाशयात उड्या ठोकुन भाजप नेते अशोक चव्हाणानी टाकलेल्या जाळ्याच्या गळाला मोठा मासा अडकला असल्याने त्या माशांचा लवकरच काँग्रेस युक्त भाजप मध्ये प्रवेश होणार असल्याच्या चर्चेला भोकर तालुक्यात उधान आले आहे.
राजकारण म्हणजे सार्वजनिक हितासाठी कार्य करण्याची एक पवित्र प्रक्रिया असावी, अशी सर्वसामान्य यांची अपेक्षा असते. पण सध्याच्या काही काळात राजकारणाचा स्तर झपाट्याने घसरत चालला आहे. सत्तेसाठी सध्याच्या परिस्थितीत व्यक्ती स्वार्थ, पैसा,जातिवाद आणि क्षिल्लक स्वार्थ पूर्तीचे राजकारण, केवळ निवडणूक जिंकणे हेच अंतिम उद्दिष्ट झाले असून त्यासाठी कुठलाही मार्ग स्वीकारला जात आहे. नैतिकता प्रामाणिकपणा आणि जबाबदारी, निष्ठा या मूल्यांना राजकीय आखाड्यात जागा उरलेली नाही. त्यामुळे जनतेचा लोकशाही वरचा विश्वास डळमळीत होऊ लागला. आपली मतदार संघात पकड कुटुंबातील नेतृत्व पुढे कसे येईल व त्यासाठी राजकीय स्थिरता हेच सध्या राजकारण्यांचे राजकारण सुरू आहे.
भोकर तालुक्यात रोग आणि राजकारण व आमदार कैलास वासी बाबासाहेब देशमुख गोरठेकर आमदार कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकर व माजी मंत्री डॉक्टर माधवराव जी किनाळकर यांच्या छत्र खाली राजकारण करत विविध भागात तालुक्याच्या राजकारणात धबधबा निर्माण करणारे म्हणजे गोविंद बाबा गोड पाटील ते घोटेकर यांच्या हयातीतच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कळपात प्रवेश केला ग त काही महिन्यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आपली सर्व नैतिकता गहाण ठेवत ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तेव्हा गोविंद पाटील हे त्यांच्यासोबत न जाता काँग्रेसमध्येच राहिले हे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष झाले लोकसभा व विधानसभा निवडणूक घेत भाजपच्या विरोधात ते सक्रिय होते यावेळी काँग्रेसची धुरा त्यांनी प्रामाणिकपणे सांभाळे लोकसभेत खासदार चव्हाण कुटुंबांना निवडून आणण्यात आपला वाटा उचलला पण भाजपची सध्या असलेली नीती घोडा थोडा आणि जोडा या गल्लीत राजकारणाचे ते बळी ठरले खासदार अशोक चव्हाण व त्यांच्या कंपनी डाव टाकीत त्यांनी गोविंद पाटील यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचे काम सुरू केले प्रथम त्यांनी गोविंद बाबा गौड पाटील यांच्या ताब्यात असलेल्या मच्छीमार संस्थेवर झोडा व फोडा या युक्ती प्रमाणे संस्था ताब्यात घेतली त्यानंतर आता ते शिक्षण संस्थेच्या नाडीवर टाच आणल्याची चर्चा आहे.त्यामुळेच कि काय ते हतबल झालेले गोविंद पाटील यांनी अखेर शरणागती पत्कारत अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या चर्चामुळे लवकरच ते आपल्या समर्थकांसह काँग्रेस युक्त भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते. सध्याचे स्वार्थाचे राजकारण हे गाव कुशीतील लोकांना कळत असून लोकांना याचा विटाळा आला आहे. त्यामुळे कोण कुठे गेले याचा काही परिणाम लोकांवर होणार नाही. एवढं मात्र निश्चित.
____________________________________________
काँग्रेस ला धक्का वैगरे काही नसुन संकटाच्या वेळी पक्ष सोडणारे नेते संधी साधु असतात.त्यामुळे त्यांच्या सारख्या कार्यकर्त्यांची गरज नाही .असे आले किती व गेले किती पक्षाला काही फरक पडणार नाही . व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दाखवून देऊ.
• काँग्रेस पक्ष ,भोकर • ___________________________________________
काँग्रेसला धक्का वैगरे काही नसुन संकटाच्या वेळी पक्ष सोडणारे नेते संधी साधु असतात.त्यामुळे पक्षाला त्यांच्या सारख्या कार्यकर्त्याची गरज नाही.आले किती गेले किती पक्षाला काही फरक पडणार नाही.
*काँग्रेस पक्ष,भोकर तालुका*
_____________________________________________