प्रतिनिधी / माली पाटील
• महसूल प्रशासन व सर्वसामान्य नागरिक यांच्यात सुसंवाद आणि शासकीय सेवा पारदर्शक व लोकाभिमुख व्हाव्यात म्हणून शासनाने दि. एक ऑगस्ट ते सात आगस्ट पर्यंत महसूल सप्ताह विविध उपक्रम आणि कार्यक्रमाने साजरा करण्यात आला होता. त्याच महसूल सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
भोकर येथील तहसील कार्यालयात दि. ७ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाची सांगता कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार विनोद गुंडमवार हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी हे होते. यावेळी प्रथम जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून भोकर विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांची निवड केली असल्याने भोकर महसूल प्रशासन कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार व गौरव करण्यात आला. त्यानंतर सांगता समारंभाच्या अनुषंगाने प्रातिनिधी स्वरूपात काही नागरिकांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात वय व रहिवासी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीलदार काशिनाथ डांगे, तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार सय्यद उमर व इतर महसूल अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्ही. चौधरी सहाय्यक महसूल अधिकारी यांनी केले.