प्रतिनिधी / माली पाटील
भोकर दि.१६- तमाम शिवसैनिकांचे दैवत,हिंदुर्हदय सम्राट स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी शिवसैनीकाकडुन श्रद्धांजली वाहण्यात आली.
दि. १६ नोव्हेंबर रोजी भोकर येथील अँड.पांचाळ यांच्या कार्यालयात स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे पुजन जेष्ठ पत्रकार तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष उत्तम कसबे यांच्या हस्ते पुजन व हार अर्पण करण्यात आले.यावेळी जिल्हा समन्वयक अँड परमेश्वर पांचाळ, जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर, संतोष कोटुरवाड, प्रकाश किसवे, विठ्ठल देवोड सावरगावकर, पाटील हे उपस्थित होते.
•÷•÷•÷•÷•÷•÷•÷•÷•÷•÷•÷•÷
स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या औच्युत्यावर सावरगाव येथील श्री विठ्ठल देवोड यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विठ्ठल देवोड यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या या प्रवेशाच शिवसेना जिल्हा समन्वयक अँड.परमेश्वर पांचाळ, जिल्हा उप-संघटक सुभाष नाईक किनीकर, पत्रकार उत्तम कसबे, किसवे प्रकाश, संतोष कोटुरवाड आदीनी स्वागत केले आहे.
֥֥֥֥֥֥֥֥֥֥֥֥
ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांची भाजपा जिल्हा सचिव हरीदत्त हाके नी घेतली सदिच्छा भेट --------------------------------------------------------------
भोकर- राज्याचे ओबीसी तथा धनगर नेते प्रकाश अण्णा शेंडगे हे नांदेड दौर्यावर आले असता नांदेड भाजप ओबीसी जिल्हा चिटणीस तथा धनगर नेते हरीदत्त हाके यांनी नांदेड येथे विश्रामगृहात सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
हिंगोली येथील ओबीसी एल्गार मेळाव्याच्या संबधी नांदेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीसाठी दि. १६ नोव्हेंबर रोजी ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे आले होते.तेंव्हा नांदेड येथील विश्रामगृहात भाजपचे जिल्हा चिटणीस तथा धनगर नेते हरीदत्त हाके पाटील यांनी प्रकाश अण्णा यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली.व त्यानंतर त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे.यावेळी प्रा.टि.पी.मुंडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सचिव माधव पाटील सलगरे, सुभाष भुतनर आदींची उपस्थिती होती.