भोकर शहरात धाडसी चोरी; १ लाख ७० च्या वर रोख व दागिने लंपास

 


              प्रतिनिधी / माली पाटील


भोकर - दि.२२ - भोकर शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती असलेले बालाजी रामन्ना कुंडलवार यांच्या घराचे कुलूप तोडून  रक्कम व सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना सकाळी रामप्रहात घडली असून यावेळी अज्ञात चोरट्या विरुद्ध भोकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की भोकर शहरातील प्रतिष्ठित असलेले व देशी दारू दुकानाचे मालक बालाजी रामनाथ कुंडलवार यांचे जो मजली घर असून त्यात खालच्या भागात देशी दारूचे दुकान आणि दुसऱ्या मजल्यावर त्यांचे राहते घर आहे सदरील घर शहरातील गजबजलेल्या मोंढा भागात आहे बालाजी कुंडलवार व त्यांचे कुटुंबे हैदराबाद स्थितीत असलेल्या आपल्या मुलाकडे दिवाळीनिमित्त गेले होते याचाच फायदा घेऊन किंवा मागावर असलेले चोरट्याने डाव साधला दिनांक वीस नंबर 2023 रोज सोमवारी लोक गाढ झोप येत असताना म्हणजे राम प्रहार तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंगल्याखाली येऊन एका रूम मध्ये झोपलेल्या नोकरदाराच्या रूमचे बाहेरून कडी लावून घेतली व बेडरूमचे कुलूप तोडून घरात शिरले आणि घरात असलेल्या कपाटाचे लाख तोडून त्यात असलेले नदी रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ७० हजाराचा ऐवज लुटून नेत पसार झाले. नंतर नोकराने फोन करून मालकाला सांगितल्याने बालाजी पाटील यांचे नातेवाईक व्यंकट कोंडलवार यांनी घराकडे येऊन पाहिले असता सदरील चोरीची घटना झाल्याचे दिसून आले. त्यानंतर व्यंकट पाटील कोंडलवाड यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली. यावेळी भोकर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध ३९८/ २०२३ भा.द. वी कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिगंबर पाटील हे करत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post