भोकर शहर कडकडीत बंद तर आक्रमक हिंदु बांधवांनी " जय श्रीरामच्या " घोषणांनी परिसर दणाणून सोडला
भोकर प्रतिनिधी / माली पाटील. ∆ बांगलादेशात सहिष्णू असलेल्या हिंदू समाजाला टार्गेट करत महिलांवर अत्याचार, मुलांना मारहाण, हिंदुंची धार्मिक स्थळे जाळुन टाकणे,म्हणताना अटक करणे आदी प्रकार घडवत हिंदू, बौध्द,शिख आदी धर्माच्या लोकांचा छळ होत असल्याने यांच्या विरोधात भोकर मधील विविध हिंदू संघटनाच्या वतीने १० नोव्हेंबर रोजी शहर बंद ठेवून जय श्रीरामच्या घोषणा देत तहसीलवर भव्य हिंदू मोर्चा काढत तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले आहे.
बांगलादेशात सध्या हिंदु वर मोठा अत्याचार, दुराचार करत बांगलादेशी नागरिक तांडव करीत आहेत. महिलांना, विद्यार्थी व तरुणांना पळुपळु हातात जे भेटेल त्याने मारत असल्याचे दिसत आहे.अल्पसंख्याक हिंदूवर अन्याय अत्याचार केले जात असून तेथील महिला मुलींवर सुद्धा अत्याचार होत आहेत. बांगलादेशातील हिंदू संकटात असून केंद्र शासनाने हा अत्याचार त्वरित थांबवा व बांगला देशाला कडक निर्बंध लादावे यास अन्य मागण्यासाठी विविध हिंदू संघटनाने एकत्र येऊन १० डिसेंबर रोजी हिंदू संघटनाच्या आव्हानानुसार श्री बालाजी मंदिर येथून सर्व हिंदू बांधव महिला, पुरुष, युवक व बाल गोपाळ निघून किनवट रोड,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातुन तहसील कार्यालय येथे भव्य मोर्चा जय श्रीरामच्या घोषणा देत काढण्यात आला.
प्रा. डॉ .व्यंकट माने यांनी प्रस्ताविक केले बांगलादेशात होत असलेल्या हिंदू वरील अन्याय अत्याचारा विरोधात सर्व हिंदू समाज बांधवांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी सांगितले .मंहत प्रभाकर बुवा कपाटे यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध तुमचे रक्त सळसळत नाही का ? भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या देशासाठी हसत हसत फासावर चढले हा आपला इतिहास आहे. आज आपल्या देशात शाळेत जाणारी मुलगी सुद्धा सुरक्षित नाही. त्यासाठी सावध होणे गरजेचे आहे,असे आव्हान केले. पिंपळगाव मठाचे मठाधिपदी व्यंकट स्वामी महाराज यांनी सर्व हिंदूंनी संघटित होणे काळाची गरज आहे असे आवाहन केले. यावेळी या मोर्चात महंत उत्तम बन महाराज चैतन्य बापु कांडली, रवी जोशी, चंद्रकांत जोशी, निर्मलाताई खळदकर जामदरी, अमरनाथ स्वामी मठपती, भगवंत गिरी,विठ्ठल महाराज शनी मंदिर, बापुराव पाटील, सतीश शहाणे, साईदास माळवंतकर, संजय सोनाळे, योगेश भोकरकर ( देशपांडे), आडेल्लू ताटीकुंडलवार, पांडुरंग थळंगे, आकाश गेंटेवाड, बालाजी घिशेवाड, महेश चिंचबनकर, शिवदास चिंताकुंटे, प्रतीक सेठ, गिरीश लक्ष्तवार, निखिल सिंगेवार, महेश गंदेवार, आकाश टाक, आकाश देशपांडे, किसू मुदीराज, प्रकाश मंदिराज आदींची उपस्थिती होती.
पुरातन अवशेष नष्ट केल्याने कार्यवाही करणे संबंधी निवेदन
------------------------------------------------------------------
भोकर येथील किनवट रोडवर गट क्रमांक ४५ मध्ये यादव कालीन दगडी खांब असलेले शिव मंदिराच्या सभा मंडपा समोरील कलावंतीनचा महाल काही अज्ञात लोकांनी तोडफोड करुन नष्ट केले असल्याने त्याचा छडा लावुन ते अवशेष पूर्ववत त्या ठिकाणी उभारण्यात यावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदार विनोद गुंडमवार यांना देण्यात आले आहे.असून भोकर शहर बंद ठेवण्याच्या आवाहन करण्यात आले होते.