प्रतिनिधी / माली पाटील
भोकर येथील श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने दि.१ व २ जानेवारी २०२५ रोजी कै. मा. आ. बापूसाहेब देशमुख गोरठेकर राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेतुन महाराष्ट्राचा महावक्ता निवडला जाणार असल्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावर्षीच्या राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचा विषय ईव्हीएम मुळे भारतीय लोकशाही धोक्यात आहे/ नाही असा असून ही स्पर्धा येत्या २ जानेवारीला भोकर येथील श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दोन फेऱ्यात पार पडणार आहे. राज्यातील सर्व महाविद्यालयाच्या सर्व शाखांच्या पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या युवकांना स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक पातळीवर पारितोषिके देण्यात येतील. प्रत्येक महाविद्यालयाचा एक संघ सहभागी होऊ शकतो पैकी एक स्पर्धक विषयाच्या अनुकूल बाजूने व दुसरा स्पर्धक विषयाच्या प्रतिकूल बाजूने आपला मत संसदीय सभेत मांडू शकतो. यावर्षीच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेच्या दोन फेऱ्या होतील पहिली फेरी १ जानेवारी रोजी याच ठिकाणी होईल. पहिल्या फेरीसाठी केवळ तीन मिनिटांचा वेळ देण्यात येईल. पहिल्या फेरीतील उत्कृष्ट ठरलेल्या दहा संघांना दुसऱ्या फेरी प्रवेश मिळेल दुसरी फेरी २ जानेवारीला पार पडेल त्यातून प्रथम येणाऱ्या एका महाविद्यालयास फिरता चषक देऊन गौरविण्यात येईल. या व्यतिरिक्त वैयक्तिक स्तरावर पहिले पारितोषिक ३१००० /- हजार रुपये, दुसरे पारितोषिक २१००० /-, तिसरे पारितोषिक ११०००/- रुपय असे स्वरूप आहे. वैयक्तिक पातळीवर समान गुण मिळाल्यास पारितोषिक विभागून देण्यात येईल. स्पर्धेचा वेळ सात मिनिटे असेल स्पर्धे नंतर त्याच ठिकाणी बक्षीस वितरण होईल. स्पर्धा आयोजका कडून प्रवास भोजन व निवास खर्च अनुज्ञ असणार नाही. स्पर्धेला येणाऱ्या संघाने आपल्या महाविद्यालयाच्या लेटर पॅडवर स्पर्धाकाचे नाव प्राचार्याच्या सही शिक्यानिशी ७५८८५२३५२० क्रमांकावर व्हाट्सअप वर दिनांक ३१ डिसेंबर पर्यंत पाठवणे आवश्यक आहे. येताना महाविद्यालयाचे ओळखपत्र आवश्यक आहे स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परीक्षेचा निर्णय अंतिम राहील असे श्री शाहू महाराज माध्यमिक उत्सव व उच्च माध्यमिक विद्यालय भोकरचे प्राचार्य एस एम सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.