दिवशी खु.येथे १५.२८ लक्ष रुपये मंजुरीच्या ग्राम पंचायत इमारतीचे भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न

 

भोकर (बातमीदार) दि.५ - भोकर तालुक्यातील मौजे दिवशी खुर्द येथे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण ग्रामपंचायत ना जन सुविधा पुरविणे योजने अंतर्गत अंदाजे १५.२८ लक्ष रुपये प्राप्त निधीतून गावांमधील नुतन ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.

जिल्हा परिषद बांधकाम विभाग भोकर च्या वतीने मौजे दिवशी खुर्द येथे दिनांक ५  जानेवारी २०२२ रोजी ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन सोहळा नांदेड जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री बाळासाहेब पाटील रावनगावकर यांच्या हस्ते पार पडले. या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रम अध्यक्षस्थानी शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगदीश पा. भोशीकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधव अमृतवाड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सतीश देशमुख, सरपंच उज्वल केसराळे ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष नाईक किनीकर सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण, सरपंच  संघटनेचे उपाध्यक्ष मारोती आंगरवाड हे होते. यावेळी 

महाविकास आघाडीच्या वतीने मान्यवर मंडळीचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दिवशी खुर्द येथील गावातील ग्रामपंचायत इमारत नसल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री ना. अशोकराव चव्हाण साहेब यांनी सन २०२०-२१ या वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजना ग्रामपंचायत ना जन सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी अंदाजे रुपये १५.२८  लक्ष रुपये मंजूर करून विकासाला चालना दिली असल्याचे प्रतिपादन सभापती बाळासाहेब रावण गावकऱ्यांनी भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमात केली. तर ही इमारत लवकरात लवकर पूर्ण करा मी व बाळासाहेब दोघांनी मिळून इमारत उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी मा.ना. अशोकराव चव्हाण साहेब यांना आपल्या गावात आणु असे आश्वासन सभापती जगदीश पा.भोसीकर यांना गावकऱ्यांना दिले. यावेळी सतीश देशमुख, सुभाष नाईक माधव अमृतवाड .यांची ही भाषणे झाली. याच बरोबर व्यासपीठावर सरपंच पेनलोड, उपसरपंच डुम्मलवाड, चंद्रकांत जाधव, सेनेचे मनोहर साखरे, व्यंकट पा. जाधव, सरपंच नितीन चौरेकर, नरेश पांचाळ, विठ्ठल पाटील, नरेंद्र पाटील,पं.स.जे.ई.पसनुरवार, ग्रामसेवक खांडरे, गुत्तेदार रायखोडकर,गंदेवार आदी उपस्थित होते. हे कार्यक्रम

यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीचे तथा सरपंच गजानन ढगे,चेअरमन तथा शिवसेनेचे नेते गंगाधर महादवाड, रामदास गाढे, उत्तमराव मुंडकर, गाढे रामदास, तंटामुक्ती अध्यक्ष रामजी भालेराव,मारोती कोटगिरे, नारायण कोकुलवार,मा.सरपंच नागोराव जगदान,माधव गडे, रामदास कोटावाड, भिमराव पाटील, उत्तम बोरशेट्टे, साईनाथ बोरशेट्टे, कैलास कदम, भिमराव हनवते,श्रावण राठोड,धनु पवार,बाबु राठोड आदी गावकरी हजर होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक बेटलींगवार यांनी केले तर आभार सरपंच गजानन ढगे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post