ना घराची पर्वा, ना संसाराची शिवसेना व बाळासाहेब यांचीच पर्वा करणार्या कट्टर शिवसैनिकांची भगव्याने गळफास घेऊन आत्महत्या

 


भोकर -(सुभाष नाईक यांचे कडुन) - दत्तात्रय नारायण वराडे ६५ वर्षीय या शिवसैनिकांचं नाव ते उस्मानाबाद शहराचे रहिवासी. दत्तात्रय वराडे आपल्या वयाच्या २२ व्या वर्षी पासून म्हणजे सन १९८४  ला उस्मानाबाद शहरात पहिली शिवसेनेची शाखा पोर जमा करून स्थापन केली. आणि ती पण उधारीचे पैसे घेऊन अत्यंत सामान्य राहणी पत्र्याचे घर व तंगीची आर्थिक आर्थिक परिस्थिती असतानाही कट्टर शिवसैनिक असलेले कै. दत्तात्रेय वराडे हे कोशन कोस पाई व काही ठिकाणी सायकलवर जाऊन शाखा खोलायचे. व त्यात सायकल वर शिव

सेनेचा प्रचार करायचे. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा प्रेम असायचे त्यांच्या अंगाअंगात शिवसेना व बाळासाहेब भिनले होते. या शिवसेनेच्या नादात ते घराकडे सुद्धा लक्ष द्यायचे नाही. त्यांचं लग्न झालं तीन मुली दोन मुलं असा परिवार होता यातच त्यांनी चहाची टपरी टाकली अशातच निवडणुका आल्या की, ते आपली जगण्याचे साधन असलेली चहा टपरी पंधरा पंधरा दिवस बंद ठेवून जीव तोडून निवडणुकीच्यावेळी घरोघरी हात जोडून प्रचार करायचे व निवडणूक संपली की आपली चहाची टपरी पुन्हा सुरू करायचे. असे हे शिवसेनेत कट्टर बाळासाहेबांचे शिवसैनिक, यातच त्यांनी तीन मुलीचे लग्न केले तर दोन मुलं शिक्षणा अभावी कापडाच्या दुकानात नोकरी करून घर चालीत आहे. मी शिवसेनेत आहे हाच ते अभिमान गेली ३५ वर्षे बाळगून होते. पण त्यांच्या हालाखीची परिस्थिती अधिकच झाली असल्याने ते अस्वस्थ होते. त्यांच्या या काळात

     ऊस्मानाबाद जिल्ह्यात चार आमदार व दोन खासदार सेनेचे झाले. पण अशा या कट्टर शिवसैनिकाकडे कोणीच लक्ष दिलं नाही. काही दिवसांपर्वीच वर्तमानपत्रातून कट्टर शिवसैनिक असलेले दत्तात्रेय वराडे हे अत्यंत हलाखीचे जीवन जगत असल्याच्या बातम्या पसरल्या पण एकाही शिवसेना नेत्यांनी व आमदार-खासदारांनी याकडे लक्ष दिले नाही. अखेर आज पहाटे ४ जानेवारी रोजी त्यांनी शिवसेनेच्या भगव्यानेच गळपास घेतल्याचं दुर्दैवी घटना समोर आली. ते त्यांच्या घराशेजारील झाडाला भगव्याच्या साह्यानेच त्यांनी गळफास घेऊन अखेरचा निरोप घेतला. बाळासाहेबांच्या एकवचनी पणाला महाराष्ट्रातील एक पिढी भुलली होती व त्यात हिंदुत्वाची साथ.. ना बाळासाहेब कधी शिवसैनिकांची जात विचारली नाही , शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या जातीचा विचार कधी केला नाही. पण अलीकडच्या काळात एक वचनी पणा निष्ठा राहिली नाही. आता जातीवर पद मिळत आहेत अशा या शिवसैनिकाला शिवसेनेकडून पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दत्तात्रय वराडे यांचे कार्य वाया न जाऊ देता त्यांच्या कुटुंबाला मदत करतील हीच सर्व शिवसैनिकांची भावपूर्ण श्रद्धांजली असेल.

Post a Comment

Previous Post Next Post