किनी येथे दत्तनाम सप्ताह निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न

 


भोकर ( नारायणरेड्डी करेमगार) दि.५ : भोकर तालुक्यातील मौजे किनी येथे दि.५ जानेवारी २०२२ रोजी वाड्या खालील दत्त मंदिरात दत्तनाम धुन सुरु असुन या गुरुवर्य श्री गंगाधर गिरी महाराज कारेगावकर यांच्या हस्ते महापुजेचे कार्यक्रम संपन्न झाले.


यावर्षी या मंदीराच्या भिंती व पिल्लरने मंदिराचे सभामंडप बांधकामास आज दि.६ रोजी सकाळी १० वाजता गुरुवर्य श्री गंगाधर महाराज कारेगावकर  यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी श्री सुभाष नाईक किनीकर, गंगारेड्डी मुस्कुवाड,मुत्यम कुम्मरवाड, नारायणरेडी करेमगार, दत्तप्रसाद नाईक,अनील नाईक, शेषराव नाईक,रामारेड्डी आप्पलवाड,गंगारेड्डी मुस्कुवाड,रमेशरेड्डी आल्लुरवाड,व्यंकटरेड्डि कुंटलवाड,कोपेलवाड भुमारेडी    ,राजलिंगु गणुवाड, महेंद्र रेड्डी बोंतलवाड आदी होते. यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी गावातील हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post