किनी गावच्या विकासाकडे लोकप्रतिनिधी व शासनाचे दुर्लक्ष ; मुलभूत विकास व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी

                    प्रतिनिधी / माली पाटील 

• किनी व परिसराच्या  विकासाकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक विकासापासून वंचित राहत असल्याने या भागातील जनतेत तिव्र नाराजी असुन यात किनी गाव ही विकासापासून कोसो दुर असल्याने याकडे लक्ष देऊन विकासाला चालना देऊन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जनतेकडून होत आहे.

     भोकर तालुक्यातील किनी हे गाव मोठे व सर्कलचे ठिकाण आहे.मुक्ती संग्रामाच्या काळात किनी हे गाव सोन्याची किनी म्हणून ओळखले जायायचे.परंतु मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या वेळी रझाकारानी हल्ला करुन जवळपास ८० बैलगाड्या भरून येथील सोने व मौल्यवान वस्तू लुटुन नेले असल्याचं ईतीहास आहे.या मुक्ती संग्रामात किनी येथील सात क्रांति कारक लोकांना बलीदान द्यावे लागते.असे हे क्रांती विरहाचे गाव पण या गावच्या मुलभूत विकास व सुविधा कडे शासन अधिकारी व आमदार, खासदार व जिल्हा प्रशासन यांचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.किनी हे दहा हजार लोकसंख्येच गाव.येथे शैक्षणिक व्यवस्था कसलीच नाही.येथील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यसायीक शिक्षणासाठी भोकरला जावे लागते.त्यामुळे येथे व्यावसायीक असलेले मिनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मंजुर करणे गरजेचे आहे.तर येथे अकरावी व बारावीच्या शाखा जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये सुरू करणे गरजेचे आहे.यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करणे गरजेचे आहे.येथे उप बाजार समिती असुन ती नावालाच आहे.त्यामुळे येथे शुक्रवार चा बाजार सुरू करून शेतकरी व जनतेला दिलासा द्यावा.येथे कृषी व्यवसायिक शाळा काढणे गरजेचे आहे.आरोग्य सुविधांसाठी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करुन दवाखान्याचे विस्तार करत नविन ईमारत बांधून विकास करावा. खा. अशोक चव्हाण व आ.श्रीजया चव्हाण यांनी येथे लग्न मंडपम साठी दिड कोटी रुपये मंजूर करुन लोकांना कार्यक्रम, समारंभ करण्यासाठी दिलासा द्यावा.तसेच राईस मिलच्या खालील भागात तलाव मंजूर असून शेतकऱ्यांना मावेना ही मिळाला पण ते तलाव गत विस वर्षांपासून त्यांच्या कामाचा पत्ताच नाही.त्यामुळे खा.रविद्र चव्हाण व आ.श्रीजया चव्हाण याकडे लक्ष देऊन तलावाचे काम सुरु करावे.जेणे करुन जमीनी सिंचनाखाली येतात.येथे ग्रामीण पोलीस ठाणे मंजूर झाले असुन जागे अभावी ते तसेच पेंडीग रहात आहे.याकडे गावकरी व सरपंच यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. येथील शेतकऱ्यांना शेती विषयक माहिती व्हावी म्हणून येथे शेतकरी कार्यशाळा सुरू करणे गरजेचे आहे. दोन अंगणवाडी शाळा कार्यरत असुन त्यांना ईमारत मंजूर करावे.खेळाडुसाठी खेळ मैदान व साहित्यासाठी निधी उपलब्ध करून देणे.नवीन वस्तीत नाली व रस्तेसाठी निधी उपलब्ध करण्यात यावे. यासाठी खासदार, आमदार यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.अशा अनेक विकासापासून किनी गाव दुर आहे याकडे शासन व लोकप्रतिनिधी लक्ष देऊन विकास करतील अशी अपेक्षा किनी वाशी व्यक्त केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post