भोकर प्रतिनिधी / माली पाटील
सेवा समर्पण परिवार भोकरच्या वतीने यावर्षी 2022 मध्ये दिला जाणारा ग्रामसेवा समर्पण पुरस्कार स्मार्ट व्हलेज म्हणून नावारूपास आलेल्या व आय एस ओ नामांकन नामांकन झालेल्या स्मार्ट विलेज म्हणून नावारूपास आलेल्या हाडोळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अनिताताई माधवराव अमृतवाड यांना घोषित झाला आहे या पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम 11 हजार रुपये व मानपत्र सहित सन्मानचिन्ह असे देण्यात येणार आहे हाडोळी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ अनिता माधवराव अमृत वाघ यांनी गावासाठी अतिशय उत्तम काम व विविध योजनाची चांगल्या तऱ्हेने अंमलबजावणी करून गाव आयुष्य करण्यासाठी त्यांच्यासहित गावाने केलेले सामूहिक प्रयत्न करून स्मार्ट व्हिलेज म्हणून गाव नावारूपास आणले त्यांच्या या कामी त्यांच्या याकामी त्यांचे पती श्री माधवराव अमृतवाड यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे अनिता अमृतवाड यांना पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे हार्दिक स्वागत तमाम तालुक्यातील सरपंच चेअरमन व सर्व राजकीय पक्षांनी केले आहे.