∆ जन्मजात खाकी कडून मिळालेले बाळकडू तिला शिस्तप्रिय प्रियता आनंदी सेवेची येथ देणारे ठरले त्यामुळे तिचे ध्येय निश्चित होते ते गाठण्यासाठी तिने चिकाटी आणि सातत्य कायम ठेवले त्याच बळावर सीडीएस तसेच एएफसीएट हे दोन्ही अडथळे तिला लीलया ओलांडता आले परिणामी दोन आठवड्यात तिची पहिल्यांदा इंडियन आर्मी कॅप्टन म्हणून निवड झाली. तर आता तिला इंडियन एअर फोर्स मध्ये फ्लाईंग ऑफिसर बनण्याची संधी चालून आली. कोणत्याही पालकांचा पूर आनंदाने भरून यावा, असा हा दुहेरी आनंद येथील सहाय्यक पोलीस आयुक्त एसीपी संतोष खांडेकर (वाघमारे) त्यांच्या पत्नी सौ.शारदा खांडेकर यांच्या वाटेला आला. सौ.शारदा व संतोष खांडेकर (वाघमारे) हे मुळचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मौजे मसाई वारंगा गावचे. यांची मुलगी कु.प्रियांका तिचे प्राथमिक शिक्षण नागपुरात झाले. वडील पोलिस दलात असल्याने कर्तव्य आणि बदलीची भिंगरी फिरत होती त्यामुळे कधी वासिम कधी अमरावती तर कधी पुन्हा नागपूर असा शैक्षणिक प्रवास करणाऱ्या प्रियांकाने एन आय टी मधून २०१९ ला इलेक्ट्रानिक्स मध्ये (बी. टेक ) केले लगेच नोकरीच्या निमित्ताने गलेलठ्ठ पगाराचे आमिष होते. मात्र देशसेवेच्या ध्येयाने झपाटलेल्या प्रियांकाने धुडकावून यूपीएससी च्या निमित्ताने दिल्ली गाठली. नंतर करण्याच अर्थ आला परंतु जिद्द आणि चिकाटीच्या बळावर प्रियांकाची आगेकूच सुरूच राहिली कम्बाईन डिफेन्स सर्व्हिसेस (सी डी एस ) परीक्षेत देशातून चौथी हे (आय आर-४) आली त्यामुळे तिला आर्मीत लेफ्टनंची संधी मिळाली तर आता हे एएफसीएटीच्या परीक्षेत निकाल लागला त्यात तिची एअरफोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. प्रियांकाचे वडील श्री संतोष खांडेकर वाघमारे हे अनेक वर्षांपासून शहर पोलिस दलात वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. आता ते एसीपी म्हणून नागपूर येथे सेवा देत आहेत त्यांच्या मुलीने हे गौरवास्पद दुहेरी यमिळाल्याची बातमी शनिवारी त्यांना करतात त्यांचा आनंद द्विगुणित झाला.
धनगर पुत्री असलेल्या कु.प्रियांका वाघमारे हिचे भोकर तालुका धनगर समाज व यशवंत सेनेकडुन यशवंत सेनेचे महाराष्ट्र राज्य सदस्य नागोराव शेंडगे बापु, यशवंत सेनेचे मराठवाडा संघटक तथा शिवसेनेचे तालुका नेते सुभाष नाईक किनीकर,राज हाके,व्यंकट राव वाडेकर, शिवसेनेचे साहेबराव भोंबे,सरपंच मारोती भोंबे,पंकज चोंडे, दत्तप्रसाद नाईक,अनील नाईक,विलास किसवे, धुळबा शिंदे,माधव सलगरे,राजु नरोटे,गोपाळ भोंबे, सदाशिव हुलगुंडे, संतोष वाघमोडे,अमृत पाटील,मारोती वरणे आदींनी अभिनंदन केले आहे.