भोकर शहरातील अष्टविनायक नगरांमध्ये दोन लाखांची धाडसी चोरी

 

                     बातमीदार / माली पाटील

भोकर शहरात पुन्हा चोरांचा सुळसुळाट सुरु झाला असून शहरातील अष्टविनायक नगरांमध्ये चोरट्यांनी घराला कुलूप असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी  घराचे कुलूप तोडून घरात शिरुण घरातील रोख रक्कम व वस्तू सह अंदाजे दोन लाखांचा ऐवज चोरुन पसार झाले आहे.या प्रकरणी भोकर पोलीसात अज्ञात चोरट्या विरुध्द दि.६ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत फिर्यादी अर्जदार श्री सुरेश रामचंद्र श्रीरामवार या अष्टविनायक नगर भोकर यांनी आपल्या घराला कुलूप लावून सर्व कुटुंबीय देवदर्शनाला म्हणून नाशीकला गेले होते.पण दि. २ ते ५ एप्रिल च्या दरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात शिरुण घरातील कपाट फोडुण कपाटातील ४५ हजार रुपये व सोन्या -चांदीचे दागिने असे एकूण अंदाजे दोन लाख रुपयांचे समान घेऊन पसार झाले आहेत.आपल्या घराचे कुलूप तुटल्याचे पासुन श्री सुरेश श्रीरामवार यांनी फिर्याद दाखल केली.या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुध्द भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक श्री अनील कांबळे हे तपास करीत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post