तालुका प्रतिनिधी / माली पाटील
विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भोकर येथील डा.आंबेडकर चौक येथे आज दि.14 एप्रिल रोजी डा.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करुन त्यांना विनम्र अभिवादन करत 'प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने तालुका अध्यक्ष श्री अड.शेखर कुंटे यांनी डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरित्रावर आधारीत पुस्तकाच वाटप आजच्या जयंती कार्यक्रमात वाटप केले. प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष अड.शेखर कुंटे यांनी पुस्तकाचे वाटप सर्वा वाचकाना केले व हा चांगला कार्यक्रम आज जंयतीच औचित साधुन वाटप केले .या कार्यक्रमाच्या प्रसंगी पोलीस निरीक्षक विकास पाटील,जेष्ठ पत्रकार बाबुराव पाटील, एल.ए.हिरे,उत्तम बाभळे,जयभिम पाटील, भैकरचे सर्वपक्षीय नेते ज्यामध्ये काँग्रेस पक्षाचे गोवींद पाटील,नागनाथ घिसेवाड,सुभाष पा.किन्हाळकर, गोविंद दंडवे, नागोराव शेंडगे,विनोद चिंचाळकर,शिवसेनेचे शिवाजी किन्हाळकर,स्वप्नील रेड्डी,भाजपचे प्रशांत पोपशेटवार,मनशेचे राजु कवडे, प्रहार अपंग जिल्हा संपर्क प्रमुख राजु ईबीतदार,युवा आघाडीचे गोवर्धन चिंचबनकर आदि हजर होते.