तालुका प्रतिनिधी / माली पाटील
भोकर येथील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय मागासवर्गीय मुला मुलींचे वस्तीगृहात घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम गुरुवार दि.१४एप्रिल २०२२ रोजी शासकीय मागास वर्गीय मुलींचे वस्तीगृहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी गृहपाल सुमीत्रा साळुंके या होत्या प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविक मुलांचे गृहपाल उमाकांत जाधव यांनी केले,विद्यार्थी व विद्यार्थिनीनी बाबासाहेबांच्या जीवनावर मनोगत व गीत गायणातून विचार मांडले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार एल.ए.हिरे म्हणाले बाबासाहेबा एवढा खडतर प्रवास कुणाच्या वाट्याला आला नाही विध्यार्थीदशेपासून ते शेवट पर्यंत जातीय विषमतेचे चटके त्यांना सहन करावे लागले म्हणून त्यांनी या व्यवस्थे विरूद्ध संघर्ष केला.विध्देची खरी देवता सावित्रीबाई फुले असुन गावकुसाबाहेर अस्पृश्य लोकांसाठी फुले दापत्यानी शाळा काढल्या पुर्वी शूद्र बहुजन लोकांसाठी शाळेची द्वारे बंद होती.सनातन्यानी त्यांना खुप छळले तरी त्यांनी आपले ध्येय सोडले नाही १८९० फुलेंच्या निधना नंतर १४एप्रिल १८९१रोजी महासुर्य जन्माला आले ते म्हणजे भीमराव आंबेडकर होत चार चार दिवस उपाशी राहुन पाव रोटीवर आठरा आठरा तास अभ्यास करून शिक्षण क्षेत्रात उंच भरारी घेतली बडोद्याचे सयाजी राजे,शाहू महाराजानी शिष्यवृत्ती देवून सहकार्य केले म्हणून ते लंडन अमेरिकेत जावून आदर्श विध्यार्थी बनले.इकडे रमाई गवऱ्या धापून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना मुले राजरत्न,गंगाधरला,इंदू याना गमवावे लागले.असा रमाईचा त्याग आहे. बाबासाहेबांनी हजारो वर्षांपासून चालत आलेली रूढी जातीय विषमता गुलामी नष्ट करण्यासाठी खुप हाल अपेष्टा सहन केल्या समता स्वातंत्र्य लोकशाहीवर आधारित संविधान लिहून बहुजन समाजाला न्याय मिळवून दिला.विध्यार्थ्यांनी मोबाईल,टीव्हीच्या नादी न लागता बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेवून अभ्यासात सातत्य ठेवण्याचे आवाहन हिरे यांनी केले.
मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बी.आर.पांचाळ म्हणाले बाबासाहेबानीच तमाम ओबीसी, एससी,एसटी बहुजन समाजाला स्वाभीमानाने जगण्याचा अधिकार दिला.बीटेक इंजिनिअर अमोल कदम,प्रा.गजानन गायकवाड,मारुती गायकवाड यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला .
अध्यक्षीय समारोपात गृहपाल सुमित्रा साळुंके यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये फार मोठी ताकद असून ते समजून घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी कायम ठेवून शिक्षणात पुढे जाण्याचा प्रयत्न करावा असे ते म्हणाले. कनिष्ठ लिपिक मनभे,शिपाई भोसले,जयपाल लांडगे यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले सूत्र संचलन दिपक वाघमारे यांनी केले तर आभार आर.जी.सोनटक्के यांनी मानले.