भोकर तालुका प्रतिनिधी
∆ अत्यंत प्रतिकूल घरच्या परिस्थितीतून कुठलेही खाजगी टेन्शन न लावता आपल्या वडील भावाच्या आधिपत्याखाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षेत अभ्यास करून महाराष्ट्रात सोळाव्या रक मध्ये पास होऊन न्यायाधीश पदासाठी यश प्राप्त केली आहे. अशी कुमारी स्वरांजली सुधाकरराव हाके तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भोकर तालुक्यातील मौजे थेरबन या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील (धनगर) कु.स्वरांजली सुधाकरराव हाके हिने यंदाच्या एमपीएससी परीक्षेत न्यायाधीश पदासाठी घवघवीत यश प्राप्त करून आपल्या कार्य कर्तृत्वाची व जिद्द ,मेहनत आणि आपल्या ज्ञानाच्या बळावर आपले वडील भाऊ अँड.जगदीश हाके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली कु.स्वरांजली हाके हिचे न्यायाधीश म्हणून यश मिळाल्यामुळे तिचे भोकर तालुक्यात मोठे कौतुक होत आहे. एमपीएससी च्या या स्पर्धा परीक्षेत न्यायाधीश या पदासाठी यश मिळाल्याने भोकर तालुका धनगर समाज व यशवंत सेनेच्या वतीने कु.स्वरांजली हिचा व तिच्या आई-वडिलांचा हृदय पूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी यशवंत सेनेचे राज्य प्रमुख सदस्य तथा ओबीसी नेते श्री नागोराव शेंडगे बापू, शिवसेनेचे तालुका नेते तथा यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख, पत्रकार श्री सुभाष नाईक किनीकर, धनगर समाज तालुका अध्यक्ष व्यंकटराव वाडेकर, राज हाके, मारोती वरणे,बोजमवार बोरगावकर यांनी केले. कु.स्वरांजली हिच्या यशाचे अभिनंदन सरपंच मारुती भोंबे, शिवसेना तालुका संघटक साहेबराव भोंबे, चेअरमन गजानन हाके, विलास किसवे, धुळबा शिंदे, शेतकरी कंपनीचे अध्यक्ष माधव सलगरे, अनिल नाईक, दत्तप्रसाद नाईक, अतुल नरोटे, संभाजी शिंदे, बाळू वाघमोडे, शंकर देवकते, गोपाळ भोंबे यांनी केले आहे.