प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
•दि. १६ /०९/२०२० •••••••••••••••
आमचा मान व आमची शान, समाजप्रिय अस्मिता लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण साता समुद्रापार रशीयात झाले याचा आनंद गगनात मावेनासा झाला म्हणून सर्व समाज बांधव एकत्र येऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आनंदोत्सव साजरा केला.
भोकर (प्रतिनिधी)- येथील सर्व अण्णाभाऊ साठे प्रेम समाज बांधवांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते रसियामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धा कृती पुतळ्याचे अनावरण झाल्याचे औचित्य साधून भोकर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आयोजक बालाजी वाघमारे अनिल डोईफोडे श्याम वाघमारे सखाराम वाघमारे नगरपरिषदेचे कर्मचारी तथा माजी नगरसेवक प्रतिनिधी दिलीप वाघमारे राहुल शेळके के वाय देवकांबळे इत्यादींनी प्रश्रम घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल डोईफोडे पत्रकार यांनी केले,
या कार्यक्रमाला जस्ट शाहीर वाघमारे कृष्ण मुरकर आणि संच यांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमातून अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर अनेक गीते गाऊन अभिवादन करण्यात आले तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक शाहीर बाबुराव गाडेकर यांनी अण्णाभाऊ साठे च्या जीवन चरित्रावर आपल्या शेरोशायरीतून अंगावर शहारे येण्यासारखे गीत सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली, यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माहूरकर अण्णा, उत्तमरावजी बाबळे, नामदेव वाघमारे ,पत्रकार बरकमकर, पत्रकार अहमद करखेलीकर, भाजपाचे गणपत पीट्टेवाड,मटकमवाड, मनसेच्या सौ पूजा बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ यशोदाबाई शेळके सौ वंदना डोईफोडे,सौ सुनीता डोईफोडे, इत्यादी मान्यवरांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून गायनाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. माझी मैना गावावर राहिली माझी जीवाची होतीया काहीली या छकडने सर्व उपस्थिताचे मने जिंकली फटाक्याचे अत्यशबाजी करून कार्यक्रम भव्य असा साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकात अलोट जनसागर जमला होता . या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भोकर तालुका व भोकर शहरातील जनतेने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला, व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सर्वानुमते अभिनंदन करण्यात आले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे व शाहिरांचे आभार बालाजी वाघमारे यांनी मांनले