मौजे पिंपळढव, दिवशी येथील विज कोसळुन मरण पावलेल्या कुटुंबास जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांची सांत्वन भेट े



         प्रतिनिधी /माली पाटील किनीकर 

              (   दि.२३ /०९ / २०२३ )

भोकर :(प्रतिनिधी) भोकर तालुक्यात विज कोसळुंन जीवीत हाणी झालेल्या कुटुंबीयांना दि.२३ सप्टेंबर रोजी शिवसेनेचे नांदेड जिल्हा प्रमुख तथा मा.आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सांत्वन पर भेट देऊन दिलासा त्या पिडीत कुटुंबाला दिलासा देत आर्थिक मदत केली.

          भोकर तालुक्यामध्ये अतिवृष्टी स्वरूप पाऊसात वीज कोसळून जिवित हाणी होण्याचे प्रकार वाढलेले आहेत.यादरम्यान जिवितहाणी झालेल्या शेतमजुर कुटुंबियांना शासकीय आर्थिक मदत मिळाली नसल्याच्या अनुषंगाने दि २३ रोजी जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकरांनी मौजे पिंपळढव येथील दि ८ सप्टेंबर रोजी वीज पडून मयत झालेल्या शेतमजुर ललिता सुभाष पोले वय ४४ वर्ष यांच्या घरी त्याच प्रमाणे मौजे दिवशी येथिल शेतमजुर दि १९ सप्टेंबर रोजी वर्षा शंकर तिगलवाड वय ३५ यांच्याही निवासस्थानी सांत्वनपर भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांना धिर देऊन त्यांना आर्थिक मदत करुन शिवसेनेचे २०% राजकारण आणि ८०% समाजकारण करण्याचे धोरण दाखवून दिले आहे.तालुक्यामधील समाजकारण तसेच राजकारणाची जाण असलेले शिवसेना कार्यकर्ते माधव पाटील वडगांवकर यांनी सदरील घटनेची माहिती घटना घडल्याच्या दिवशीच भ्रमणध्वनी वरुन दिली होती.त्याच अनुषंगाने तालुक्यातील अतिवृष्टी सदृश्य पावसासंबंधी तसेच वीज पडून मयत झालेल्या कुटंबियांबद्दल माहिती जिल्हाप्रमुख आष्टीकरांनी आढावा घेतला.तसेच शहरातील नामदेव वाघमारे यांचे वडील लालबाजी वाघमारे यांचे शंभराव्या वर्षी निधन झाले त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांना धिर दिला.

याप्रसंगी शहरातील समाजिक कार्यकर्ते डाॅ.यु.एल.जाधव,दिलीप तिवारी,गजानन अडकीने यांच्या कडून जिल्हाप्रमुख आष्टीकरांचे पुष्पहार घालुन भव्य स्वागत करण्यात आले.भोकर शहरातुन दिवशी कडे जात असताना आष्टीकरांचे मौजे कांडली,मातुळ येथे कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.यावेळी जिल्हाप्रमुख यांनी भोकर शहरात लवकरच शिवसेना संपर्क कार्यालय निर्माण करुन जनसामान्यांसह शिवसेना कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले या वेळी अँड परमेश्वर पांचाळ,सतिश देशमुख,पांडुरंग वर्षेवार,संतोष आलेवाड,बालाजी येलपे,सुनिल जाधव,आनंदाबाई चुनगुरवाड,साहेबराव भोंबे,महोहर साखरे,गंगाधर महादावाड,रमेश पोलकमवार,दिवशी सरपंच गजानन ढगे,राजु पोगरे,आनंद जाधव हस्सापुरकर,कृष्णा कोंडलवार,माधव करेवाड,अक्षय शिंदे,रवण बोरगावे,रामा भालेराव,पप्पु पिंगलवाड यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post