प्रतिनिधी / सुभाष नाईक किनीकर
दि. २७. सप्टेंबर २०२२
भोकर तालुक्यातील दहा गावचे सरपंच पद जानेवारी २०१९ पासून अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार सदस्य मिळत नसल्याने ते पद रिक्त होते. येथील ग्राम पंचायतचा कारभार उपसरपंच चालवत होते. पण बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव डॉक्टर कैलास कानिंदे रेणापूरकर यांच्या मागणीची दखल घेऊन आज तारीख २७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार राजेश लांडगे यांनी सर्व कायद्याचा अभ्यास करून व जिल्हाधिकारी यांचे आदेश ग्राह्य धरून पुढील काळासाठी सरपंच पदासाठी नवीन आरक्षण जाहीर केले .
यात सरपंच पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे रेनापुर अनुसूची जाती, जाकापूर अनुसूचित जाती ,धारजणी अनुसूचित जाती, धावरी खुर्द. अनुसूचित जाती ,रावणगाव अनुसूचित जाती महिला ,दिवशी खुर्द अनुसूचित जाती महिला ,हासापूर अनुसूचित जाती महिला ,सायाळ अनुसूचित जाती महिला ,कोळगाव खुर्द अनुसूचित जाती महिला व बटाळा/ किन्हाळा अनुसूचित जाती महिला, असे आरक्षण जाहीर करण्यात आले आता या गावाला हक्काचा सरपंच मिळणार असून गावच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे अशी अपेक्षा गावातील नागरिकांमधून व्यक्त होताना दिसून येत आहे या आरक्षण सोडतीच्या बैठकीला गटविकास अधिकारी अमित राठोड निवडणूक विभागाचे कर्मचारी व अनेक गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.