प्रतिनिधी/ सुभाष नाईक किनीकर
( दि.८/०९/२०२२ गुरुवार )
आता ठिक २.२० मि.मौजे पिंपळगाव येथे विज पडून एक महिला मृत्यू झाली असुन तिचा पती जख्मी झाला आहे.
या बाबत माहिती असली कि,पिंपळढव येथील श्री सुभाष पोले यांनी आपल्या पत्नी दोन मुलगा सहित शेतात काम करण्यासाठी गेले होते.त्पयांचे शेत जवळच वाघु नदीजवळ आहे. ठीक २ वा. पाऊस थोडा थोडा येत असल्याने सुभाष पोले,ललीता पोले व दोन मुलं हे झाडाखाली जेवाया साठी बसले असता पाऊस मोठा आला आणी यातच विज कोसळली यात ललीता सुभाष पोले वय ४० वर्षं यांच्यावर विज कोसळुन ती जागीच ठार झाली.यात जवळच बसलेले सुभाष पोले हे सुद्धा जख्मी झाले सोबत दोन मुलं होती सुदैवाने त्यांना कोणती विजा झाली नाही.याची माहिती प्रशासनाला दिली असल्याचे सेनेचे साहेबराव पाटील भोंबे यांनी सांगितले.