प्रतिनिधी / सुभाष नाईक किनीकर
भोकर दि.२९ - या महिन्यात झालेल्या जोरदार पाऊस होऊन त्यात विजेचा कडकडाट होऊन या भोकर तालुक्यातील मौजे पिंपळढव आणि मौजे दिवशी बु. येथील महिला शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाला होता. यामध्ये पिंपळढव येथील महिला शेतकरी स्वर्गीय ललिता सुभाष पोले तसेच दिवशी बुद्रुक येथील महिला शेतकरी कै. वर्षा शंकर तिघलवाड या दोघीच वीज पडून मृत्यू झाल्यामुळे शासनाच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना आज दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्येकी चार लाख रुपयाचा धनादेश वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला .
सदरील धनादेश उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार राजेश लांडगे, माजी जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब रावणगावकर, मार्केट कमिटीचे सभापती तथा काँग्रेस तालुका अध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर,नायब तहसीलदार चामनर मॅडम, संचालक रामचंद्र मुसळे, शिवसेनेचे तालुका संघटक साहेबरावजी भोंबे पा, शिवसेनेचे तालुका नेते सुभाष नाईक किनीकर, सरपंच मारोतराव भोंबे पा., श्री आनंदराव ढवळे, पत्रकार राजेश वाघमारे,सुभाष पोले, चंद्रकांत भोंबे,शंकर तिघलवाड सह दोन्ही गावांतील नागरीक उपस्थित होते.