भोसी येथील भ्रष्ट वैद्यकीय अधिकारी यांची बदली करा- भाजप


              प्रतिनिधी/ जळबा क्षिरसागर 

भोकर - भोकर तालुक्यातील मौजे भोसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर मनमानी कारभार चालला असून येथे येणाऱ्या रुग्णांना चांगली वागणूक न देता भ्रष्टाचार करत मनमानीचा कळस वैद्यकीय अधिकारी यांनी गाठला असल्याने अशा  मुजोर अधिकाऱ्याची येथून त्वरित बदली करून चांगला आरोग्य अधिकारी नेमावा अशी मागणी भाजपच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मौजे भोसी विभागाच्या रुग्णासाठी भोशी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु हे आरोग्य केंद्र असून नसल्यागत आहे. कारण येथे आरोग्य आरोग्य अधिकारी म्हणून महिला अधिकारी कार्यरत आहे. या महिला अधिकारी यांचा येथे मनमानी कारभार चालला आहे, या आरोग्य केंद्राकडे या महिला अधिकाऱ्याच लक्षच नसून येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाची मोठी गैरसोय होत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या गलथान कारभारामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना वेळेवर औषधी न मिळणे, रुग्णांना बेड न देता गाद्या जमिनीवर टाकून झोपण्यासाठी देतात, त्यावरच रुग्ण तसेच झोपतात. पण त्यांची कसलीच सोय केली जात नाही. तसेच येथे कॅम्प घेऊन येथे आलेल्या महिला रुग्णांना पैशाची मागणी सुद्धा करण्यात येत आहे. याविषयी तक्रार केली तर वैद्यकीय अधिकारी उडवा उडवी चे उत्तर देतात त्यामुळे या प्रार्थमिक आरोग्य केंद्रात गलथान कारभारा समवेत भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणावर केला असल्याने या वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी तात्काळ  करून त्यांची येथून उचल बांगडी करावी अशी मागणी भाजपने मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर घुगे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. या निवेदनावर भाजप तालुका चिटणीस कपिल कल्याणकर, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष निखिल कल्याणकर, तालुका उपाध्यक्ष शहाजी कल्याणकर, स्वप्निल मोरे आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post