किनी प्रतिनिधी / रमेश शिंकोजीकर
किनी दि. २९ - किनी येथील विश्वधाम ज्ञानपीठ ट्रस्टच्या वतीने गरजू वृद्ध ,निराधार महिला व लहान मुलांना चादरी लुगडे व लहान मुलाला शर्ट पॅन्ट चे वाटप दिपवाळीचे औचित्य साधुन वाटप करण्यात आले आहे.
किनी येथील गोर गरीब गरजू लोकांना ज्यात वृद्ध पुरुष,महिला व लहान मुलांना दिपावलीचे औचित्य साधून दि.२९ ऑक्टोबंर रोजी विश्वधाम ज्ञानपीठ ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष श्री गणपत पांडलवार यांनी वृध्दाना चादरी (रग), महिलांना साडी चोळी तर लहान मुलांना अंगभर कपडे असे वस्त्रदानाचे कार्यक्रम केले.गरज वसंताची दिवाळी सुखाची जावो,त्यांना त्यांच्या पुरवणी श्रीमंती कळावी व आनंदात सण गरजु लोकांनी करावी हाच उद्देश घेऊन विश्वधाम ज्ञानपीठ ट्रस्टचा असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष गणपत पांडलवार यांनी सांगीतले.यावेळी भुमन्ना महाराज नडकुडवाड यांच्या हस्ते वाटपाचे कार्यक्रम पार पडले.यावेळी गणपत पांडलवार,भुमन्ना नडकुडवाड, व्यंकटरेड्डी दोडीकिंदवाड , कोंडीबा बासनुरे आदी उपस्थित होते.