दिवशी बु.येथील साठवण तलावात गेलेल्या जमीनीचा मोबदला न मिळाल्याने भुसंपादीत शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयासमोर अमर उपोशन

 


           प्रतिनिधी / सुभाष पाटील किनीकर 

 भोकर दि.३ - मौजे दिवशी बुद्रुक तालुका भोकर येथे शासनाने साठवण तलाव मंजूर केला असून या साठवण तलावाच्या संपादित जमिनीची मोजणी सुद्धा झाली आहे पण शेतकऱ्यांना आजपर्यंत अद्याप मावेजा मिळाला नसून यामुळे जमीन संपादित झालेली शेतकरी हैराण असून त्यांना जमिनीचा मोबदला ताबडतोब देण्यात यावा असे शासनाला वारंवार निवेदने देऊन विनंती केली होती पण शासन व संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मौजे दिवशी बुद्रुक येथील शेतकरी दिनांक 3 सप्टेंबर 2022 पासून तहसील कार्यालयासमोर अमर उपोषणास बसले आहेत यात तुळशीराम कदम, भोजन्ना भरडेवाड, संजय कदम ,रुक्‍माबाई गुंडेराव, लक्ष्मण काळेकर, संगीता कदम, संजय कदम, सावित्रीबाई टिकेकर, सत्वशीला कदम, रमेश कदम, माणिक भरडेवाड ,लक्ष्मण पोतरे, बाबू गुंडेराव, ऊसाजी गुंडेराव, जलाल साब शेख, मरीबा काळेकर प्रकाश कदम, बालाजी टेकुलवार, शंकर पोत्रे, दयानंद कदम व नरसय्या मेंडेवाड उपोषणास बसले आहेत.

           शिवसैनीकांची उपोषण स्थळी भेट 

   तहसील कार्यालयासमोर अमर उपोशनास बसलेल्या दिवशी बु.येथील शेतकऱ्यांना शिवसेनेचे श्री सुभाष नाईक किनीकर, सर्कल प्रमुख  रमेश महागावकर,संजय चिकटे, विठ्ठल बक्कावाड व गणेश आरलवाड यांनी भेट देऊन उपोशनास पाठिंबा दिला.        




Post a Comment

Previous Post Next Post