प्रतिनिधी / सुभाष नाईक किनीकर
भोकर दि.१५ (तालुका प्रतिनिधी)- हा देश कुण्या एका जाती पंथाचा नाही, सर्वांचा विचार करणारा देश आहे मात्र स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही ओबीसींच्या हिताची क्रांती येथे झाली नाही असे परखड मत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा.लक्ष्मणराव हाके यांनी भोकर येथे ओबीसी सन्मान मेळाव्यात बोलताना मांडले.
भोकर तालुका ओबीसी समन्वय समितीच्या वतीने येथील ओम लॉन्स येथे १५ डिसेंबर २०२२ रोजी ओबीसी सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले मान्यवरांच्या सन्मानानंतर ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड यांनी प्रास्ताविकात ओबीसी आरक्षण व ओबीसींच्या समस्या याबाबत विचार मांडले प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा. लक्ष्मणराव हाके पुढे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी साठी प्रथम ३४० वे कलम लिहून घटनेत ओबीसी आरक्षणाची तरतूद केली त्यावेळी त्यांना काही लोकांनी विरोध केला ओबीसींना आरक्षण कशासाठी असे विचारले असता डॉ. बाबासाहेब म्हणाले गाव कुशीमध्ये दिन दलित राहतात त्यांना आरक्षण मिळाले परंतु गावकुसा बाहेर दर्या खोऱ्यात माळ रानात राहणारा आदिवासी समाज इतर बहुजन समाज त्यांनाही आरक्षणाची गरज आहे त्यांची शिक्षणात प्रगती व्हावी असे ते म्हणाले, ढवळ्या पवळ्याची सत्ता येते मात्र ओबीसींची सत्ता येत नाही ओबीशीसाठी या देशात झिरो पॉईंट सात एवढेच बजेट आहे, आता आपल्या विचारांची माणसं सत्तेत गेली पाहिजे, संविधान धोक्यात आलेले आहे, झोपू नका, भाकरी परतावी लागेल, भाकरी करपू नये याची काळजी घ्या, २८८ आमदारांपैकी विधानसभेत किती ओबीसीचे आमदार आहेत, ओबीसींच्या हक्काच विकासाचं, न्यायाचं कुणी बोलत नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू, महात्मा फुले यांचे फोटो घराघरात लागले पाहिजेत, व्ही.पी. शिंगांनी १९९० साली मंडल आयोग लागू केला २७ % आरक्षण मिळालं त्यानंतर सध्या स्थितीत आरक्षण गेल्यात जमा आहे, विधानसभेत कुणी बोलत नाही, लोकसभेत ओबीसीचे १३७ खासदार आहेत ओबीसींच्या हितासाठी कोणी बोलत नाही, इम्पेरियल डाटा केला जात नाही त्यासाठी पैसे नाहीत, ११४ देशात आरक्षण दिल्या जाते मात्र भारतात नाही, ओबीसी उध्वस्त होतोय, सामाजिक न्याय देण्याचं काम फुले शाहू आंबेडकरांनी केलं,आजच्या स्थितीत या देशात समृद्धी महामार्गासाठी करोडो रुपये खर्च केले जातात मात्र ओबीसींना राहण्यासाठी घर देखील नाही हे वास्तव आहे, सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले माणसं जोपर्यंत सत्तेत पोहोचत नाहीत तोपर्यंत ओबीसींना न्याय मिळणार नाही, आता ओबीसी चळवळ वाढली पाहिजे, जातनिहाय जनगणना जाणीवपूर्वक केल्या जात नाही, जातनिहाय जनगणना झाली तर ओबीसीची संख्या कळून येईल, महाराष्ट्रातील ओबीसी समाज एक झाला तर काय होईल हे देखील कळणार आहे, संघटित होऊन एकजुट मजबूत करा, आपल्यामध्ये हत्तीचे बळ आहे, आपल्या सोबत एस. सी. एस. टी. आले तर काय होऊ शकत नाही, आता ओबीसींची चळवळ वाढवा गावागावातील ओबीसी एकत्र आला पाहिजे असेही शेवटी ते म्हणाले, डॉ.यु.एल.जाधव, गोविंद बाबा गौड यांनी यावेळी विचार मांडले, व्यासपीठावर नरसा रेड्डी गोपीड वाढ, नागोराव शेंडगे, बालाजी शिंदे, दत्तात्रय पांचाळ, उज्वल केसराळे, सुनील चव्हाण, राजेश अंगरवार, मोहन श्रीराम वार, बाबुराव गोपतवाड, निळकंठ वर्षेवार, बालाजी पिंगलवाड, बाबुराव सायाळकर, सतीश देशमुख आदींची उपस्थिती होती मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी, माधवराव अमृतवाड, बालाजी शानमवाड, सुरेश बिल्लेवाड, पत्रकार बी.आर.पांचाळ, विठ्ठल फुलारी, ऍड. परमेश्वर पांचाळ, संदीप गौड, अंबादास आटपलवाड, आदिनाथ चिंताकुटे संतोष अनेराये, मोहन राठोड, डॉ. राम नाईक, ऍड. शेखर कुंटे, सुभाष नाईक, राजेश्वर रेड्डी आदींसह ओबीसी समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले शहरातून सकाळी ९ वाजता उमरी रोड पासून शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे ओम लॉन्स पर्यंत चार चाकी व दुचाकी भव्य असे रॅली काढण्यात आली.