प्रतिनिधी/ माली पाटील किनीकर
भोकर दि.२३- भोकर शहरातील बायपास उमरी रोड आज दिनांक 23 रोजी दुपारी पाचच्या दरम्यान भोकर कडुन उमरीकडे जाणाऱ्या आटोला म्हैसा रोड बायपास कडून येणाऱ्या आंध्र प्रदेश पासिंग मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्याने यात आटोत बसलेल्या महिला प्रवासी कौशल्याबाई लक्ष्मण कोईलवाड राहणार रायखोड वय ५४ वर्षे ह्या धडकेत जागीच मरण पावल्या आहेत तर त्या मयत महिलेचे पती लक्ष्मण कोईलवाड राहणार रायखोड व इतर एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्यांना भोकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे पाठविण्यात आल्याचे समजते.
भोकर :(प्रतिनिधी) येथील उमरी रस्त्यावरील वळणरस्त्यावर (बायपास)दुपारी ३.४५ वाजता भरधाव वेगात म्हैसामार्गावरुन नांदेड कडे जाणाऱ्या ट्रक क्र एपी ०७ टी जी २२५९ याने अँपे आँटो क्र एम एच २६ एसी ४१५७ यांस जोराची धडक दिली.त्यामध्ये एक वयोवृद्ध महिलेचा जागीच मृत्यु झाला असुन मयत महिलेचे नाव कौशल्याबाई लक्ष्मण कोईलवाड वय ५० वर्षे रा.रायखोड ता.भोकर तर जखमीमध्यर लक्ष्मण कोईलवाड .
असुन जखमींवर भोकर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करून अधिक उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.भोकरहुन उमरीकडे जाणाऱ्या ऑपे ऑटोला तेलंगणातून नांदेडकडे भरधाव वेगात जानाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली यात रायखोड येथील बसलेले प्रवासी नामे कौशल्याबाई कोईलवाड ह्या धडकेत ठार झाल्या तर त्यांचे पती नामे लक्ष्मण कोईलवाड आणि ईतर १ प्रवासी जबर जखमी झाले.
सदरील चौकात अपघाताची मालिका चालू असून ह्या चौकात मागील चार वर्षांत अनेक लोकांचे बळी गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.