प्रतिनिधी/ रमेश शिंकोजीकर
दि. २६ जानेवारी २०२३
किनी ता.भोकर - वसंत पंचमी हा हिंदू सण दरवर्षी माघ महिन्यात साजरा केला जातो. याचे औचित्य साधून किनी येथील ४० ते ५० महिला सरस्वती देवीचे नवस फेडण्यासाठी व देवीचे जन्म दिवस साजरा करण्यासाठी किनी ते बासर असा ६० किमी अंतरचा पदयात्रा करत निघाल्या आहेत.
वसंत पंचमी या सणाची सुरुवात आर्य काळात झाली. आर्य लोक सरस्वती नदी ओलांडून खैबर खिंडीतून भारतात स्थलांतरित झाले. आदीम सभ्यता असल्याने त्यांचा बहुतांश विकास सरस्वती नदीच्या काठावर झाला, अशा प्रकारे सरस्वती नदी सुपीकता आणि ज्ञानाशी संबंधित आहे. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो. ज्ञान आणि शिक्षणाची देवी म्हणून माॅ सरस्वतीची पूजा करण्यासाठी वसंत पंचमी साजरी केली जाते. हा सण माघ महिन्याच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. आज दिनांक २६ जानेवारी वसंत पंचमीचा दिवस असून तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीकाठी असलेल्या श्रीक्षेत्र बासर येथे ज्ञानदेवी सरस्वतीचे मंदिर आहे.
येथे आज लाखो भाविक विद्यादेवीच्या दर्शनासाठी व जन्मदिवस म्हणून या ठिकाणी येतात. तसेच आपल्या मुलांना अक्षर अभ्यास साठी सरस्वती देवीसमोर बसून ज्ञान आशीर्वाद मागतात. यासाठी किनी येथील जवळपास ५० महिलांचा जथ्था पायी चालत बासर येथे आलेला आहे. येथे येऊन गोदा नदी व सरस्वती देवीचे दर्शन घेऊन नवस फेडतात, असे दरवर्षी किनीच्या महिला वसंत पंचमी चे अवचित साधून किनी ते बासर असा ६० किमी चा पायी यात्रा करत बासर येथे सण साजरा करतात.