प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
(दि. १६ फेब्रुवारी २०२३ )
भोकर येथे तहसील समोर असलेल्या सेतु सुविधा केंद्रात दुसऱ्या मजल्यावर लोखंडी शिडी चढून जाण्या साठी बाल व वयोवृद्ध लोकांना वर कार्यालयात जाणे अशक्य असल्याने ते सेतु सुविधा केंद्र खालच्या मजल्यात सुरु करुण केंद्रात जनतेची लयलुट होत असुन येथे दर पत्रक लावता मनमानी होणार्या कारभाराची चौकशी करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी शिवसेना उपतालुकाप्रमुख सुनील चव्हाण भुरभुशीकर यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार राजेश लांडगे यांच्या कडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भोकर येथे चौहान यांचे सेतु सुविधा केंद्र आहे.सर्व सामान्य जनतेची कार्यालयीन कामे सोईचे व्हावे म्हणून सुविधा केंद्र शासनाने सुरू केले आहे. पण चौहान यांचे सेतु सुविधा केंद्र तहसील समोर असुन कार्यालय दोन मजल्यावर असुन वर चढण्यासाठी लोखंडी पायर्या चढून जावे लागते.परंतु बाल, वयोवृद्ध ग्राहकांना पायर्या चढून वर जाणे शक्य नसुन येथे अगर कोणाचा वर चढते वेळेस तोल गेला तर याचे जिम्मेदार कोण? म्हणून वरच्या मजल्यावरील सेतु केंद्र खालच्या मजल्यात सुरु करण्याच्या सुचना द्यावेत. तसेच येथे येणाऱ्या ग्राहका ची मोठी गैरसोय होत आहे.येथे दर पत्रक नसल्याने कोणत्याही कामाच्या कागद पत्रांसाठी अव्वाच्या सव्वा दर लावत असल्याने याची चौकशी करावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा माजी जि.प.सदस्य सुनील चव्हाण यांनी तहसीलदार राजेश लांडगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.