प्रतिनिधी/ माली पाटील किनीकर
जिल्ह्यातील नाकर्ते राजकीय नेत्यांमुळे समाजाचा विकास खुंटला असुन वडार समाज अनेक समस्याला तोंड देत आहे.त्यामुळे तेलंगणातील बि आर एस पक्ष नुकतेच पदार्पण केले असुन तेलंगणातील राज्यात मोठ्या प्रमाणात विकास साधल्या जात असुन मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांचे ध्येय धोरणामुळे आकर्षित होऊन हा समाज या पक्षाकडे झुकणार असल्याचे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष निळकंठ वर्षेवार यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यात वडार समाज मोठ्या प्रमाणात असून हा समाज विकासापासून कोसो दूर किंवा वंचित आहे. स्थानिक पुढारी व राजकीय पक्षाचे नेते समाजाकडे दुर्लक्ष करीत असल्याने समाजात संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. वडार समाज हा दगड फोडीचा व्यवसाय करणारा असून या समाजाला आतापर्यंतच्या सरकारने कसलीच सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याने वडार समाज आपला मूळ व्यवसाय सोडून ऊस तोडी करण्यासाठी व आपले जिवन गुजरान करण्यासाठी कारखान्यावर आपले कुटुंब घेऊन संसाराचा गाडा हरकत आहे. खरे तर वडार समाज किंवा वडार कुटुंब याचा अर्थ पारंपारिक स्वरूपात हाताने दगडफोडीचा व्यवसाय करणारा समाज.
हा व्यवसाय पारंपारिक असताना रॉयल्टी च्या नावाखाली या समाजास अनेक अडचणी निर्माण करून या समाजावर प्रशासनाकडून अन्याय होत आहे. याकडे जिल्ह्यातील आमदार, खासदार व स्थानिक नेते हे अक्षमपणे दुर्लक्ष करत असून फक्त समाजाचा मतासाठी जोगवा मागण्याचा वापर होत आहे. यामुळे तमाम वडार समाजात प्रचंड रोष असून आता हा समाज महाराष्ट्राच्या राजकारणाला कंटाळला आणि नवीनच राज्यात पाऊल ठेवणाऱ्या बिआरएस या पक्षाच्या ध्येय धोरणामुळे आकर्षित होऊन लवकरच हा समाज तालुक्याच्या ठिकाणी बैठका घेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राबत असलेली धोरणे यात, मुलीच्या लग्नासाठी एक लाख रुपये लग्न खर्च, मयत झालेल्या नैसर्गिक व नैसर्गिक असो यांना शासनाकडून पाच लक्ष रुपये अनुदान अशा अनेक योजनांमुळे हा समाज तेलंगणाकडे आकर्षित होत आहे. वडार हा सतत ऊन, पाऊस,थंडी याची पर्वा न करता दगडफोडीचे काम करतो, अशा काम करणाऱ्या या समाजाच्या लोकांना केव्हाही धोका होऊ शकतो. तसेच तेलंगणा राज्यात ज्या लोकांना शेती नाही अशा लोकांना गायरानाच्या स्वरूपात पाच एकर जमीन मोफत दिली जाते. अशा अनेक लोक उपयोगी योजना तेलंगणात राबविली जात असल्याने आता जनतेचा कौल हा बी आर एस पक्षाकडे होताना दिसून येत आहे. म्हणून नांदेड जिल्ह्यातील तमाम वडार समाजाची बैठक घेण्यात येणार असून यात किनवट, इस्लापूर, हिमायतनगर, भोकर, उमरी, धर्माबाद, बिलोली, कुंडलवाडी व देगलूर या तालुक्याचा समावेश असून सर्वानुमते लवकरच बी आर एस पक्षा संदर्भात पाठिंबा द्यायचा किंवा नाही यासंबंधी निर्णय होणार असल्याचे वडार समाजाचे समाजसेवक व युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष निळकंठ वर्षेवार यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
छान बातमी
ReplyDelete