खासदाराच्या एकलशाहीला कंटाळुन भोकर तालुक्यातील भाजपचे शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश

     


             प्रतिनिधी / माली पाटील किनीकर

 भोकर दि.३१- तालुक्यातील भारतीय जनता पार्टी मधील एकाधिकारशाहीला कंटाळत तालुक्यातील मार्केट कमिटीचे संचालक व सरपंच संघटनेचे तालुका उपाध्यक्ष असे अंगरवाड बंधु व भाजपचे माजी नगरसेवक डॉ.राम नाईक,माजी सभापती सुरेश पोकलवार यांनी सुद्धा काँग्रेस मध्ये प्रवेश करुन घर वापसी केली तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यामुळे अशा अनेक चांगल्या पदाधिकारी असलेल्या कार्यकर्ते्यानी पक्षाला रामराम ठोकल्याने तालुक्यात भाजपला उतरती कळा लागली असल्याचे दिसून येत आहे.                                                               दि.३० मार्च रोजी नांदेड जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित प्रवेश सोहळ्यात भोकर तालुक्यातील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजु अंगरवाड,भाजपचे तथा सरपंच संघटनेचे तालुका उपाध्यक्ष मारोती अंगरवाड, देवठाणा तंटामुक्ती अध्यक्ष दिलीपराव देशमुख, ग्राम पंचायत सदस्य संजय उदगीरे, व्यंकटराव बत्तलवाड अमरसिंह जाधव,संकट जाधव, ज्ञानेश्वर गोदेवाड, पांडुरंग येदले,प्रेमभंग जाधव, ओमप्रकाश शिंदे,श्याम काळे अनील कर्हाळे, सुरेश बोईनवाड,रामजी राठोड यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कार्यावर विश्वास ठेवत प्रवेश केला आहे.यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष  तथा माजी आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हा अध्यक्ष गोविंद नागेलीकर,मा.आ.ओम पोकर्णा, डॉ.मिनल खतगावकर,श्रावण रॅपनवाड, सुरेंद्र घोडजकर, जगदीश पाटील भोसीकर, नामदेव आयलवाड, सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधव अमृतवाड, विनोद चिंचाळकर, रामचंद्र मुसळे उपस्थित होते.             '                      भाजपमध्ये गेलेल्या भोकरच्या दोन माजी नगरसेवक ही भाजपच्या मनमानी कारभारास कंटाळून घर वापसी करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. डॉ.राम नाईक व सुवेश पोकलवार या दोघांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश करुन घेतला.यामुळे भोकर तालुक्यातील भाजपची वाताहत झाली असुन यामुळे काँग्रेसचे तालुक्यात बळ वाढले आहे.     

     भोकर तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण                         

  भोकर तालुक्यातील अनेक विकासाची कामे सुरू असुन व काही कामे झाली आहेत.यापुढे ही तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही व देवठाण्याचे अंगरवाड बंधु व अन्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन चांगला निर्णय घेतला असून यामुळे तालुक्यात काँग्रेस पक्षाला बळकटी मिळाली असल्याचे प्रतिपादन पक्षप्रवेश सोहळ्याच्या वेळी अशोक चव्हाण यांनी विश्वास व्यक्त केला केला.

Post a Comment

Previous Post Next Post