प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
∆ भोकर तालुक्यातील वन परिमंडळ किनी अंतर्गत येणाऱ्या आमठाणा जंगलात सागवान लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच वनविभाग अधिकाऱ्यांनी धाड टाकली यात लाकूड तस्कर फरार झाले असून येथे असलेली बैलगाडी व माल जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती किनी वन परिमंडळ अधिकारी रितेश भेराने यांनी दिली . याबाबत असे की, वन विभागास गुप्त माहिती मिळाली की, वन परिमंडळ किनी अंतर्गत येत असलेल्या नियत क्षेत्र आमठाणा येथील कक्ष क्रमांक ३४१ मध्ये काही लाकूड तस्कर सागवान लाकडाची कत्तल करून माल नेण्याच्या मार्गावर आहेत,अशी माहिती मिळाली माहिती मिळताच दिनांक ११ मार्च रोजी उपवनसंरक्षक नांदेड केशव वाबळे, सहाय्यक वन संरक्षण रोहयो व वन्यजीव नांदेड श्रीनिवास लखमावाड, भोकरचे डॅशिंग वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतीक मोडवान यांच्या मार्गदर्शना खाली किनी वनपरी मंडळ अंतर्गत येत असलेल्या आमठाणा येथे कक्ष क्रमांक ३४१ मध्ये गेले असता तेथे सागवान लाकूड तस्कर यांना पाहून पळून जाण्यात यशस्वी झाले असून येथे तोडलेली सागवानाची चाळीस नग आणि बैलगाडी व दोन बैल व लाकडी बैलगाडी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतीक मोडवान,किनी वन परिमंडळ अधिकारी रितेश भेराणे, वन कर्मचारी एपी मुंडकर बीजी शिंदे, व्हीबी बंडगर, एस गोसलवार, राहुल सोनटक्के, मुंजाजी माळगे, बळीराम माने, शंकर राठोड, आकाश जाधव, खंडू सुंकळेकर आदींनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता राखीव वनाच्या आत मध्ये जाऊन सदरचा ऐवज जप्त करून कायदेशीर कारवाई केली यामुळे लाकूड तस्काराचे धाबे दणावले आहे.