भोकर रुरल फार्मर्स प्रोड्युसर कंपनीस रुरल चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घुईखेडकराची भेट


         प्रतिनिधी / माली पाटील किनीकर

            ( दि. २१ मे २०२३  वेळ : ५:३० वा )

भोकर येथील भोकर रुरल फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ली,या कंपनीस सरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घुईखेडकरा यांनी भेट दिली असून शेंद्रीय शेती व प्रक्रिया उद्योग बाबत शेतकरी व संचालकांनी चर्चा केली आहे.

  सध्या शेतकरी हा बदलत्या काळानुसार शेती करावी आणि रासायनिक खता बरोबर शेंद्रीय शेती करत प्रक्रिया उद्योगाकडे वळले पाहिजे तरच शेतकरी रोग मुक्ती आणि सुखाचे दिवस पाहतील अन्यथा अशीच शेती करत राहिल्यास प्रगती ऐवजी अधोगती कडेच जाईल असे प्रतिपादन सरल चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घुईखेडकर यांनी दि.२१ मे रोजी भोकर रुरल फार्मर्स प्रोड्युसर कंपनीस भेट दिली त्यावेळी संचालक व शेतकऱ्यां समोर केली.यावेळी अकोला जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष गजानन फुंडकर हे हजर होते. कंपनीच्या वतीने अध्यक्ष माधव पाटील सलगरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.या चर्चा सत्रात दरम्यान शेतकऱ्यांनी शेती सोबत इतर उद्योग कसे करावे या संबंधीची माहिती दिली.बांबु लागवड, गोट फार्म, विक्री खरेदी,शासनाची सबसिडी, तसेच शेंद्रीय शेतीची गरज रासायनिक खतांच्या अती वापरामुळे होणारे नुकसान आदी बाबींवर चर्चा करत अतुल घुईकोटकर यांनी समजावुन सांगीतले.यावेळी संचालक सुभाष नाईक किनीकर, वामन महाराज पर्वत, शेतकरी राज हाके पाटील, बालाजी ईसानकर,दत्ताहरी शिंदे,दत्ता कदम, बालाजी कदम, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुका अध्यक्ष उत्तम कसबे, स्वामी आदी उपस्थित होते.कंपनीचे अध्यक्ष माधव पाटील सलगरे यांनी सर्वांचे आभार मानले.



Post a Comment

Previous Post Next Post