भोकर येथे राजमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त दिनांक ३१ मे रोजी भव्य रक्तदान शिबिर व प्रख्यात किर्तनकार ह.भ.प. कु .कांचनताई शेळके यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आणि अहिल्यादेवी होळकर बोर्डाचे अनावरण असे विविध कार्यक्रम आयोजित केले असल्याचे जयंती मंडळाचे अध्यक्ष राजेश हाके पाटील यांनी सांगितले आहे.
अतिशय दानशूर कर्तत्वान धर्म पारायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्यादेवी होळकर हे नाव मराठ्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिले गेले.
त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दिनांक 31 मे रोजी असून या २९८ जयंती च्या निमित्ताने भोकर येथे ३१ मे २०२३ रोजी प्रथम सत्रात लक्ष्मणराव घिसेवाड जुनिअर कॉलेज येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब रावणगावकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक हे राहणार असुन प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख बबन बारशे , युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तिरुपती उर्फ पप्पू कोंडेकर माजी सभापती नागनाथराव घिसेवाड, लोकनेते बाळासाहेब देशमुख बारडकर, बालाजी शानमवाड उप सभापती कृ.उ.बा.स, राणी भोंडवे पो.उ निरीक्षक.माणिकराव लोहगावे भाजप प्रदेश उपाध्यक्ष, राजेश फुलारे, राजे खंडेराव देशमुख, किशोर पा. लगळुदकर भाजप तालुका अध्यक्ष, विश्वंभर पवार राॅंका तालुका अध्यक्ष, माधव पा. वडगावकर शिवसेना उबाठा,गणेश पा कापसे, सुनील कांबळे वंचित आघाडी ता. अध्यक्ष, सुभाष पाटील किन्हाळकर संचालक,हरिदत्त हाके, दतराम येलुरे, अँड. उत्तमराव हाके, मारुती भोंबे, विलास किसवे, भगवान नाईक बेंद्रीकर, हनमंत चोंडे, मारोती माने,नामदेव तरंगे यांची उपस्थिती लाभणार आहे.
तर दुसऱ्या सत्रात सांयकाळी ७ वा.३० मि.प्रख्यात कीर्तनकार ह.भ. प. कु.कांचनताई शेळके (झी टॉकीज फेम) यांचा सुंदर किर्तनाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून काँग्रेस नेत्या श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अँड. शिवाजीराव हाके पाटील व भोकर कृ.उ.बा स. सभापती जगदीश पाटील भोसीकर हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून माजी सभापती गोविंद बाबा गोड पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव दंडवे, अर्धापूरचे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, ओबीसी नेते नामदेव आयलवाड, रामचंद्र मुसळे संचालक, माधव अमृतवाड अध्यक्ष सरपंच संघटना, प्रकाश हाके, प्रकाश श्रीरामे सीए, जळबाराव नरोटे, मसणाची नरोटे, गजानन पानेवार, हुलप्पा हुलगुंडे, पिराजी बोडके, विठ्ठल भंडारे, शंकर काटेवार, साहेबराव भोंबे, वेंकटराव वाडेकर, कोंडबाराव कोकणे, दिगंबर शिळेकर, माधव भूतनर सर, पंजाबराव नाईक, सदाशिव पा. शेंडगे, नागेश माने,बळीराम माने आदी जन उपस्थित राहणार आहेत.
दिनांक ३१ मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समाज नेते नागोराव शेंडगे बापू सुभाष नाईक किनीकर,जयंती मंडळाचे अध्यक्ष राजेश हाके संजय देवकते, बालाजी परडे उपाध्यक्ष, निलेश चिकाळकर, नागोराव विरगाळे, निखिल सूर्यवंशी, बालाजी ईसानकर रामदास त्रिंबकवार, सदाशिव हुलगुंडे, युवा नेते तेजस मलदोडे ,अवधूत हक्के, विठ्ठल हाके, संतोष घारगे, खंडू गोरे, रमेश कोकणे, खंडेराव पानेवार, पंकज चोंडे,खंडेराव शेंडगे व पत्रकार संघाचे अध्यक्ष उत्तम कसबे यांनी केले आहे.