भोकर येथे हवामान तज्ञ पंजाबराव डक यांचा सन्मान व शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

                   लो क भा व ना न्यु ज


            प्रतिनिधी / माली पाटील किनीकर 

भोकर -सध्या पाउस रुसून बसला असुन जुन महिना संपत येत असला तरी तो बरसत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ शाखा भोकर व संदीप पाटील गौड मित्र मंडळाच्या वतीने दिनांक २४ जून रोजी सुप्रसिद्ध हवामान तज्ञ तथा शेती विषयाचे अभ्यासक पंजाबराव डक पाटील यांचा सन्मान व शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन भोकर येथे करण्यात आला आहे.

      शेतकऱ्यांना मार्गदर्शन मेळावा भोकर शहरातील माऊली मंगल कार्यालयात दिनांक २४ जून २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला असून 'बदलत्या पाऊस मानाचा अंदाज व अनुरूप पीक पद्धतीचा अवलंब'बदलत्या पाऊस मानाचा अंदाज व अनुरूप पीक पद्धतीचा अवलंब' या विषयावर मा. पंजाबराव डक पाटील हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सदरील सोहळ्यात काही शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा ही सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती गोविंद बाबा गोड पाटील, शिवाजी पा. किन्हाळकर, तहसीलदार राजेश लांडगे, माजी कृषी सभापती बाळासाहेब पा.रावणगावकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पा. भोसीकर, ओबीसी नेते नामदेव आयलवाड, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष भगवान दंडवे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधव अमृतवाड, माजी कृषी अधिकारी रमेश देशमुख, मोहन देशमुख बारडकर, राष्ट्रीय पुरोगामी  पत्रकार संघाचे तथा संपादक उत्तम बाबळे, शंकर सिंह ठाकुर यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या सोहळ्यास शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर अध्यक्ष व सर्व पदाधिकारी आणि संदीप रोड पाटील मित्र मंडळ यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post