भोकर तालुका शिवसेना सोशल मिडिया प्रमुख निष्ठावंत शिवसैनिक गुजराल सुर्यवंशीस अखेरचा निरोप
______________________________________
भोकर - शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोशल मिडिया प्रमुख तथा निष्ठावंत शिवसैनिक कै. गुजराल सुर्यवंशी यास उमरी बायपास रस्त्यावर ट्रकने चिरडले असल्याने यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असुन रात्री १० वाजता त्याच्या पार्थिव देहाला शोका- कुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
भोकर तालुक्यातील मौजे पोमनाळा येथील हाडा मासाचा शिवसैनीक शिवसेनेच्या विरोधात बोलणार्याच चिरफाड करणारा अंगा अंगात शिवसेनेचा भगवा संचा रलेला शिवसेनेचा कट्टर निष्ठावंत हिंदू मावळा असी ओळख असणारा कै.गुजराल सुर्यवंशी (वय २६ वर्षे) यांची ओळख.दि.२४ रोज शनिवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास गुजराल सुर्यवंशी हा आपली ड्युटी करण्यासाठी फॅक्टरी कडे जात असताना उमरी बायपास रस्त्यावरुन जात असताना मागुन ट्रकने धडक दिली यात गुजराल ट्रकच्या चाकाखाली आला अन् यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या या अचानक अपघात होऊन जाण्याने अनेकांना धक्काच बसला.रात्री ठिक १० वाजता त्याचा अंत्यसंस्कार मौजे पोमनाळा या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्क कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई ,वडील भाऊ बहीण असा परिवार आहे.या वेळी अनेक शिवसैनीक, मित्रमंडळी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.