पत्रकार संरक्षण कायद्यांची कठोर अंमलबजावणी करा व पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलद न्यायालयामध्ये चालवण्याची भोकर पत्रकार संघाची मागणी

 भोकर तालुका बहुभाषिक पत्रकार संघ व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भोकरच्या वतीने 

      

             प्रतिनिधी / माली पाटील किनीकर 

 महाराष्ट्रात ८ नोव्हेंबर २०१९  साली पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला  हा कायदा लागू झाल्यानंतर चार वर्षांत जवळपास २०० पत्रकारांवर हल्ले झाले मात्र ३७  प्रकरणातच पत्रकार  संरक्षण कायदा लागु झाला पण त्यातील एकाही प्रकरणात आरोपींना शिक्षा न झाल्याने बाकी प्रकरण तसेच रेंगाळल्याने त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तो कुचकामी ठरला आहे, पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होत आहेत, पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी प्राणघातक हल्ला केला ह्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर पत्रकारांचे निदर्शने होत असून भोकर येथे दि. १७ ऑगस्ट २०२३  रोजी तहसील कार्यालयासमोर पत्रकार संरक्षण कायद्या लागु करावा म्हणून भोकर तालुका पत्रकार व बहुभाषिक संघाकडून निदर्शने करीत मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन तहसीलदार भोकर यांच्या कडे देण्यात आले. 

            महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला पण त्यांची अंमलबजावणी मात्र होत नाही यामुळे गुंडांना कायद्याची भिंती राहीली नाही.पत्रकारावर जे हल्ले होतात त्यात ७५ टक्के हल्ले हे राजकीय पक्षांच्या नेत्यांकडुन किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडुन हे वास्तव आकडेवारी सह समोर आले आहे. हे थांबायला पाहिजे आणि पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता आलं पाहिजे. आरोपींना शिक्षा न झाल्याने कायद्याची उपयुक्तता संपले असून समाजकंटकांच्या मनात कायद्याची भीतीच उरली नाही.त्यामुळे  पत्रकारांवर वाढते हल्ले होत आहेत पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना पहिल्या दिवशी शिवीगाळ केली व दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर त्यांच्या गुंडांकर्वी हल्ला करण्यात आला आमदार किशोर पाटील व त्यांच्या गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करत नाहीत. पत्रकार संरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी पत्रकारांवरील सर्व  खटले जलद गती न्यायालयात चालविण्यात यावेत आमदार किशोर पाटील व त्यांचे समर्थक यांचे विरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी भोकर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून तहसीलदार राजेश लांडगे यांच्या करवी मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अहेमदभाई करखेलीकर, राजेश चंद्रे, जयभीम पाटील,म.ईलीयास,अनिल कर्हाळे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुका सचिव सुभाष नाईक किनीकर, विठ्ठल बक्कावाड, मनोज शिंदे आदीची उपस्थिती होती.                     

                        

     

 भोकर मराठी पत्रकार संघाकडून पत्रकार                           संरक्षण कायद्यांची होळी                            --------------------------------------------------------------

पत्रकार संरक्षण कायद्यांची कठोर अंमलबजावणी करा, आमदार किशोर पाटलावर पत्रकार संदीप महाजन यांच्या हल्या प्रकरणी कारवाई करावी, आदी मागण्या करत दि.१७ रोजी भोकर मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्यांची होळी करत  तहसीलदार राजेश लांडगे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष एल. ए.हिरे, भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बी. आर. पांचाळ, यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले यावेळी उपाध्यक्ष श्रीकांत देव, सचिव राजेश वाघमारे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुका अध्यक्ष उत्तम कसबे, मनोज गिमेकर, मनोज चव्हाण, अनिल डोईफोडे, जय भीम पाटील, सिद्धार्थ जाधव, बी.एस.सरोदे, अरुण डोईफोडे शिवाजी गायकवाड, शंकर कदम, लतीफ पठाण, मनोज शिंदे,प्रेस संपादक  व से.सं. उपाध्यक्ष दत्ता बोईनवाड, एजाजकुरेशी, हमीद पठाण गोविंद गिरी आदींची उपस्थिती होती.


Post a Comment

Previous Post Next Post