प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
भोकर दि.१४ - राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे तारणहार काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांचा आज दि.१४ ऑगस्ट रोजी दौरा असुन या दौर्यात ते ग्रामीण भागातील विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व भुमीपुजन करणार असल्याचे समजते.
आज तालुक्यातील मौजे नागापुर येथे ठिक २ वाजता ३३/११ के.व्ही उप केंन्द्राचे व उप आरोग्य केंद्राचे लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पार पाडणार आहे. तसेच या नंतर जल जीवन अंतर्गत रुपये ५४.१४ लक्ष पाणी पुरवठा योजनाचे ,समाज कल्याण योजने अंतर्गत रुपये १० लक्ष सि.सि रस्त्याचे काम, आमदार निधीतून रुपये १० लक्ष खर्चुन सभागृह बांधकाम व २५ / १५ योजने अंतर्गत रूपये १० लक्ष खर्चातुन गावातील सि.सी. रस्त्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.सोबत इतर ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे समजते.