किनी -पाळज रस्त्यालगतची धोकादायक झाडे झुडपे काढण्याची मागणी

 

                  प्रतिनिधी/ अनिल नाईक

किनी दि.५- भोकर तालुक्यातील मौजे किनी-पाळज वळण रस्त्याला धोकादायक काटेरी झाडे झुडपांनी विळखा घातला आहे. या रस्त्यावर असलेल्या वळणावर झाडामुळे रस्ता दिसत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वाहन चालकांना या वाढलेल्या झाडाझुडपांचा अडसर होत असून अशा ठिकाणाहून वाहन चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे आहे. त्यामुळे प्रवाशांनी या रस्त्यावरील वाढलेली झाडे झुडपे किंवा वाढलेल्या झाडांच्या फांद्या काढून टाकावीत अशी मागणी प्रशासनाकडे व वाहन चालकांनी केली आहे.

किनीहुन पाळज मार्गे तेलंगणात जाणारा मार्ग असून या मार्गावरून वाहनाची ये जा मोठ्या प्रमाणात होते  किनी कडून व पाळज वरून असे दोन मोठे वळण रस्ते आहेत, अशा या रस्त्यावर वाहनाचा वेग जास्त असतो. परंतु या रस्त्याच्या कडेला दाट झाडे झुडपे वाढली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन वाहन चालकास दिसत नाहीत. अशात जर एखादे वाहन जोरात आले तर तेथे मोठा अपघात होऊ शकतो, अशावेळी किनी-पाळज या रस्त्यालगत असणारी झाडे झुडपे तातडीने काढावी अशी मागणी महेंद्ररेड्डी  बोंतलवाड ,सुभाष नाईक नरेशरेड्डी कासारेड्डी, वेंकटरेड्डी दोडकिंदीवाड ,गंगाधर तुराटीकर, लक्ष्मण दादा कोरडे, प्रकाशगौड मुत्तेपवार, श्रीनिवास रेड्डी मुस्कुवाड, नागनाथ लोलपवाड, रमेश शिवय्या कुम्मरवाड,  श्रीधररेड्डी निघावाड, रमेशरेड्डी आरगेलवाड आदी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

देवठाणा ते सोमठाणा पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करा.

सोमठाणा फाटा ते पाळजपर्यत असा १२ किमीचा आहे.यात सार्वजनिक बांधकाम विभागाने गुगली टाकल्याप्रमाणे रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. सोमठाणा फाटा पासुन सावरगाव फाट्यापर्यंत गुळगुळीत रस्ता केला.अन त्यापुढन देवठाणा पर्यंत असा अडीच ते तीन कि.मी.चा रस्ता तसाच सोडून ते देवठाणा पासून तेलंगाना सीमेपर्यंत गुळगुळीत असा रस्ता करण्यात आला पण सोमठाणा ते देवठाणा पर्यंत चा रस्ता सोडून दिला असुन या अडीच कि.मी च्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत.रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावरुन वाहने चालवणे अवघड झालं आहे.त्यामुळे हा अडीच ते तीन किमी अंतर असलेला  रस्ता त्वरित दुरुस्त करून डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा त्या रस्त्यावर बेशरमांची झाडे लावण्याचा ईषारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय चिकटे, चेअरमन गजानन पाटील हाके, वसंत लख्खा जाधव, लक्ष्मण पवार, साहेबराव वाकोडे, शाखा प्रमुख अंगरवाड, नविनरेड्डी मंथेनवाड आदींनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post