प्रतिनिधी / माली पाटील किनीकर दि .१३ /०९ / २०२३
∆ गत ७० वर्षापासून धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करुन प्रमाणपत्र वितरीत करावे व सोलापूर येथे धनगर आरक्षणाकरिता महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आरक्षणाचे निवेदन देऊन भंडारा उधळण्यात आला होता. त्या धनगर क.ती समितीच्या समाजबांधवला मंत्र्याच्या कार्यकर्त्याकडून बेदम अमानुष मारहाण करण्यात आली होती, अशा कार्यकर्त्यावर कारवाई करावी आणि चौंडी येथे आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या बांधवांना भोकर तालुक्यातील सकल धनगर समाज व यशवंत सेनेचा पाठिंबा असल्याचे मागणी सह इतर मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री यांना भोकर तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आले आहे.
भोकर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गत ७० वर्षापासून धनगर समाजाची अनुसूचित जाती जमाती आरक्षणाची अंमलबजावणी न करता तसाच प्रश्न रेंगाळत ठेवला आहे. तसेच मंत्री राधाकृष्ण विखे यांना धनगर आरक्षणा विषयी निवेदन देत असताना तेथे उपस्थित असलेल्या भाजप पदाधिकारी व अंगरक्षक यांच्या कडुन बेदम मारहाण करण्यात आली आहे.त्यामुळे त्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अनेक वर्षांपूर्वी घटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिलेले असताना सुद्धा प्रस्थापित सत्ताधारी आणि राजकारणी यांनी आमचा आरक्षणाचा प्रश्न जाणून-बुजून सोडवलेला नाही तो सोडवावा. तसेच तीर्थक्षेत्र चोंडी जिल्हा अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या समाज बांधवांच्या उपोषणाला सकल धनगर समाज व यशवंत सेना भोकर तालुक्याचा पाठिंबा असून शासनाने या आंदोलकाची दखल घेऊन धनगर समाजाच्या
अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करून प्रमाणपत्र वितरीत करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख नागोराव शेंडगे बापू ,यशवंत सेना मराठवाडा संघटक सुभाष नाईक किनीकर, सरपंच मारोतराव पा.भोंबे, चेअरमन साहेबराव पाटील भोंबे, खंडोजी गोरे, राजेश हाके, निलेश चिखाळकर, खंडेराव शेंडगे, निकेश सूर्यवंशी, साहेबराव कोकणे, सतीश माने ,कृष्णा कवळासे, गोविंद लिंबेकर, सुशील राव शिंदे, संजय देवकते, श्रीनिवास लामगे, पांडुरंग वर्षेवार, किसनराव चेअरमन, नरोटे मसनाजी सरपंच,मारोती वरणे आदींच्या सह्या आहेत.