अखेर पठ्ठ्याने मारली बाजी......
-------------------------------------
नांदेड राष्ट्रवादी ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी इंजी.विश्वभंर पवार यांची निवड ; कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
राज्यात राष्ट्रवादी पक्षात फुट पडली यात एक गट (अजित पवार) सत्तेत गेला तर दुसरा शरद पवार यांचा गट तटस्थ राहीला. पण यात नांदेड जिल्ह्यात सोळा पैकी पंधरा तालुका अध्यक्ष हे मुख्य राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार यांच्या सोबत राहीले पण एकमेव तालुका अध्यक्ष (सोळावा) हे मात्र अजितदादा पवार यांच्या सोबत राहीले. ते आहेत भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष इंजी. विश्वभंर पवार. मग काय त्यांनी जिल्हा अध्यक्ष पदासाठी दावा केला.पण पक्षाने दुर्लक्ष केले, आणि दुसर्या पक्षातुन आयात केलेले धर्माधिकारी यांना जिल्हा अध्यक्ष बनवले.पण गप्प बसेल तो कसला वाघ !अखेर विश्वंभर पवार यांना यश आले आणि अजित पवार नेतृत्वाने अखेर ग्रामीण जिल्हाध्यक्ष (उत्तर) म्हणून विश्वंभर पवार यांचे नाव जाहीर केले.अन जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी फटाके व ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. म्हणून या भागा तील लोक खाजगीत चर्चा करताना म्हणाले काय पण असो अखेर पट्ट्याने बाजी मारलीच असे बोलत आहेत.
राजकारण करत असताना जर गाड फादर असेल तरच त्याची प्रगती होते. अन्यथा किती ही कार्य करा जिवापाड पक्षासाठी म्हणत करा पण व्यर्थच असा अनेक कार्यकर्त्यांनी अनुभव कथन केला.पण विश्वंभर पवार याला अपवादच ! कारण प्रयत्न करत असताना माघार नाही हाच ध्यास घेऊन पवार हे लढत राहिले यात त्यांना काही राजकीय लोकांचा पाठिंबा कामी आला अन् अखेर अजित पवार गटाने नांदेड जिल्हा अध्यक्ष पदासाठी विश्वंभर पवार यांचे नाव जाहीर करावे लागले.यालाच म्हणतात प्रयत्न विना फळ नाही हे तितकेच खरे आहे. कोणत्याही राजकीय पक्षांचे जिल्हा अध्यक्ष पद मिळविणे तरुणास तितके सोपे नाही. पण ते काम विश्वंभर पवार यांनी करुन दाख वले यांचा सार्थ अभिमान वाटतो. विश्वंभर पवार हे कार्यकुशल व जिद्दी ,शांत आणि तेवढेच कठोर असलेले नेतृत्व असल्याने त्यांना भोकर, अर्धापूर, मुदखेड, हदगाव, हिमायतनगर, किनवट व माहुर अशा उत्तर विभागातील तालुक्याची जवाबदारी दिली आहे. ते दिलेली जवाबदारी पार पाडतील व पक्षा च्या वरिष्ठांचे सार्थक करतील यात शंका नाही पण अखेर पठ्ठ्याने बाजी मारलीच याचीच चर्चा होताना दिसून येत.विश्वभंर पवार यांना जिल्हा अध्यक्ष पद मिळाल्याबद्दल त्यांच्या कार्यास शुभेच्छा !