भोकर शहरातील वाहतूकीची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्राचार्याचे १७ रोजी उपोषण; उपोषणास वाढता पाठिंबा

 

            प्रतिनिधी/ माली पाटील किनीकर 

भोकर दि.८- भोकर शहरात वाहतुकीचा विळखा अन् सर्व सामान्य माणसाला तिडका असी अवस्था वाहतुकीची झाली असुन याकडे पोलीस प्रशासन,  महसुल प्रशासन व नगर परिषद याकडे सतत दुर्लक्ष केले जात असल्याने याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना होत असुन त्याच्या सुरक्षितेसाठी शेंडी तुटली, पारंब्या तुटल्या तरी न्याय मिळवून देणार.त्यामुळे धोकादायक बनलेल्या वाहतुकीचा अडथळा दुर करा अन्यथा दि.१७ सप्टेंबर पासुन प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषणाला बसणार असल्याने शाहु विद्यालयाचे प्राचार्य संजय सावंत कामनगावकर बसणार असून सोबत राजकीय पक्ष,संघटना व व्यापारी यांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

    भोकर शहरात वाहतुकीचा प्रश्न मोठा गंभीर बनला असून प्रशासनाला वेळोवळी निवेदन देऊन ही दुर्लक्ष होत असल्याने अखेर शाळेच्या प्राचार्यास मैदानात उतरावे लागत असुन याचाच भाग म्हणून दि.७ सप्टेंबर रोजी एक शिष्टमंडळ निवेदन येथील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना अगर दि.१७ सप्टेंबर पर्यंत भोकर शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा केली नाही तर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.तत्पुर्वी तहसील कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात व्यापारी, विद्यार्थी, सामाजिक संस्था, कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षानी भोकर शहरातील  वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या शाहु विद्यालयाचे प्राचार्य संजय सावंत यांना पाठिंबा व्यक्त केला आहे.यावेळी विद्यार्थी, सामाजिक, राजकीय,माजी विद्यार्थी व पाठिंबा देणार्या समोर बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी म्हणून या अगोदर प्रशासनाला वेळोवेळी लेखी निवेदने दिली परंतु निवेदनाची दखल आजपर्यंत घेण्यात आली नाही त्यामुळे सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे 'शेंडी तुटो की पारंबी तुटो' उपोषणाला बसणार. आंदोलने, उपोषण हे काही नवीन नाही, मी कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा सुरक्षितेसाठी सर्वांना सोबत घेऊन १७ सप्टेंबर रोजी शांततेत उपोषण करु असे शेवटी म्हणाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख सलीम यांनी केली.


Post a Comment

Previous Post Next Post