प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
भोकर शहरात गत अनेक दिवसांपासून किनवट रोड व म्हैसा रोड वरील पथदिवे बंद असुन यामुळे सर्व सामान्य लोकांना व शालेय विद्यार्थ्यांना यांचा मोठा त्रास होत आहे.त्यामुळे प्रशासक असलेले तहसीलदार याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन सदरील बंद असलेले पथदिवे गणेश चतुर्थीच्या आदी तात्काळ चालु करावे अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कट्टर सैनिक आकाश व विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष पवन पाटील पवार यांच्या नेतृत्वाखाली भोकर नगरपालिकेचे प्रशासक राजेश लांडगे यांना देण्यात आले आहे.
भोकर शहरातील न.प.चा ढिसाळ कारभारामुळे नागरीक वैतागले असुन किनवट रोड व म्हैसा रोड वर पालिकेने लावलेले पथदिवे बंद गत अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत.त्यामुळे क्लासेसला जाणार्या विद्यार्थी व विद्यार्थीनी व सर्व सामान्य माणसाला यांचा त्रास होत आहे. अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कारण या भागात शैक्षणिक क्लासेस चालू आहेत आणि पथदिवे बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. मोटरसायकल चोरीचे प्रमाण आणि घरपुरी चोरीचे प्रकरण शहरात दिवसेंदिवस वाढलेले आहे.त्यामुळे येत्या १८ सप्टेंबर २०२३ पासून गणेश उत्सव सण सुरू होत आहेत. त्यामुळे भोकर शहरातील विविध ठिकाणच्या पोलवर बंद पडलेले पथदिवे त्वरीत चालू करावेत अन्यथा दि. १९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळ- खट्याक आंदोलन करण्यात येईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील,असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष पवन पाटील पवार, महाराष्ट्र सैनिक आकाश गेंटेवाड यांच्यासह मनसे तालुका उपाध्यक्ष सुनील पाटील पवार, मनसे तालुका उपाध्यक्ष बालाजी बोरगे, मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष ओमप्रकाश अन्नरवाड, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष आदित्य हामंद ,राजू पाटील कवडे, अवी मेटकर, मनसे विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष प्रशांत देशमुख, मनवीसे तालुका संघटक गणेश पांचाळ, विकास पाटील वानखेडे, तुकाराम मुकेवाड, राज राठोड, वैभव पाटील सोळंके, अविनाश जाधव, व्यंकटेश खंडागळे, साईप्रसाद राहुलवाड, मंगेश स्वामी माधव पाटील सूर्यवंशी, शिवा पवार, संतोष झुंजारे, दीपक भालेराव आदी मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.